ETV Bharat / state

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; महिला वर्ग व शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता - Maharashtra Monsoon Session 2024

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : पावसाळी अधिवेशनाचा आज (28 जून) दुसरा दिवस आहे. आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर होणार आहे. त्यामुळं अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी काय पडते? याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

ajit pawar
अजित पवार - विधानभवन इमारत (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 9:26 AM IST

मुंबई Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल म्हणजेच गुरुवारी पहिल्या दिवशी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर विविध प्रश्नावरून सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. तर सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच गुरुवारी ज्या आमदारांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपणार होता, त्यांचा निरोप समारंभ पार पडला. दरम्यान, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार हे सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडं सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

घोषणांचा पाऊस पडणार? : सरकारचा कार्यकाळ पुढील तीन ते चार महिन्यात संपणार आहे. त्यामुळे सरकारचं हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. सरकारकडून शेवटचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. 40 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या पदरी अपयश आलं. त्यामुळं आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, महिलांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. "सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून मोठमोठ्या घोषणा होऊ शकतात. पण याची अंमलबजावणी करण्यासाठी हे सरकार राहिले तर पाहिजे. सरकारचे हे शेवटचे बाय-बाय करणारे अधिवेशन असणार आहे," अशी टीका विरोधकानी केली.

या योजनांची घोषणा होऊ शकते? : एकीकडे नुकतेच तेलंगाणा राज्यात दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली. त्यामुळं याच पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजा हा अतिवृष्टी आणि दुष्काळाने ग्रासलेला असताना शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते.

महिला वर्ग व मुलींसाठी खास घोषणा? : तसेच महिलांसाठी मध्य प्रदेशमध्ये "लाडली बहेना" ही योजना निवडणुकीपूर्वी तिथे आणली होती. त्याचा फायदा तिथे भाजपाला झाल्याचे निवडणूक निकालामध्ये दिसले. याच धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांची मतं मिळवण्यासाठी "लाडली बहेना" ही योजना अर्थसंकल्पातून आज जाहीर होऊ शकते. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळू शकतात. यामुळे राज्याच्या तिजोरीवर वीस हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. तर मुलींसाठी मोफत शिक्षण यासंदर्भात देखील मोठी घोषणा होऊ शकते.

हेही वाचा -

  1. अजित पवार नको रे बाबा! भाजपावाल्यांनी आवळला सूर, भाजपा-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी - Controversy In BJP Over Ajit Pawar
  2. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन - उद्धव ठाकरे - Maharashtra assembly session
  3. राज्याच्या अर्थव्यवस्थेत 7.6 टक्क्यांनी वाढ अपेक्षित; राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर - Economy Survey Report

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.