ETV Bharat / state

लागा तयारीला; राज्यात दिवाळीनंतर फुटणार विधानसभा निवडणुकीचे फटाके? - Maharashtra Assembly Election 2024

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक 2024 साठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र विधानसभेची मुदत ऐन दिवाळीच्या सणात संपत असल्यानं सरकारकडून दिवाळी झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 12:00 PM IST

Updated : Aug 13, 2024, 12:24 PM IST

मुंबई Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला फटका बसल्यानं राज्यात महायुतीच्या वतीनं विविध घोषणांची खैरात सुरू आहे. सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जात आहे. "लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर होऊ नये, म्हणून या निवडणुका थोड्या लांबवण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे," असं राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी सांगितलं.

केव्हा संपते विधानसभेची मुदत? : हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची विधानसभांची मुदत जवळपास सारख्याच कालावधीत संपत असल्यानं या दोन्ही राज्यांची निवडणूक एकत्र घोषित केली जाते. हरियाणा राज्याची विधानसभेची मुदत तीन नोव्हेंबरला संपत आहे, तर महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 ला संपुष्टात येणार आहे. या दोन्ही राज्यांच्या मुदत संपण्याच्या कालावधीत 23 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणा राज्याच्या मुदतपूर्व निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. नियमाप्रमाणं कोणत्याही विधानसभेचा मुदतीचा कालावधी संपण्यापूर्वी किंवा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार विचार करता निवडणुका ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दिवाळीनंतर निवडणुका घेण्याची विनंती : सणासुदीच्या काळात निवडणुका घेऊ नयेत, असा संकेत आहे. राज्यात 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2024 दरम्यान दिवाळी सण आहे. त्यामुळे या कालावधीत निवडणुका घेण्यात येऊ नयेत. तसेच मुदतीपूर्वी निवडणुका घेऊन राज्य सरकारवर अन्याय करू नये, यासाठी राज्य सरकारच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुका दिवाळीनंतर घेण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली. त्यामुळं एकूण परिस्थिती पाहता राज्यात निवडणुकांचे फटाके हे दिवाळीनंतरच फुटतील, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

हेही वाचा :

  1. महायुतीचा निवडणुकीसाठी प्लॅन ठरला? सुरू आहेत बैठकांवर बैठका - Maharashtra Assembly Election
  2. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? जाणून घ्या नेत्यांचं मत काय? - face of chief minister

Last Updated : Aug 13, 2024, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.