ETV Bharat / state

श्रीमंतांच्या वस्तीत सर्वात कमी मतदान, तर कामाठीपुऱ्यात मतदानाला तुफान प्रतिसाद; कोणाला फायदा मिळणार?

मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील कामाठीपुरा भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. त्याचा कोणाला फायदा होणार हे 23 तारखेला समजणार आहे.

Voting of women in Kamathipura
कामाठीपुऱ्यातील महिलांचं मतदान (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

मुंबई - राज्यात बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे एकाच टप्प्यात मतदान पार पडलंय. एका बाजूला अतिसंवेदनशील भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. तर दुसरीकडे मुंबईत मात्र मतांची टक्केवारी कमी दिसतेय. मुंबईतील उच्चभ्रू भाग अशी ओळख असलेल्या कुलाबा विधानसभेत सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. खरं तर हा परिसर उच्चभ्रू लोकांच्या वस्तीचा मानला जातो. तरीसुद्धा इथे 50 टक्केही मतदान झालेलं नाही. पण तेच मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील कामाठीपुरा भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झालंय.

कामाठीपुरा देशात 3 नंबरचा सर्वात मोठा रेड लाइट भाग: दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या कामाठीपुरा परिसरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी यंदा लोकशाहीतील आपला महत्त्वाचा अधिकार बजावत मोठ्या संख्येने मतदान केलंय. विशेष म्हणजे कामाठीपुऱ्यात देहविक्रय व्यवसायात असणाऱ्या दोन हजार महिलांनी कोरोना काळात राजकीय नेत्यांनी केलेली मदत लक्षात घेऊन मतदान केल्याची भावना व्यक्त केलीय. कामाठीपुरा देशात तीन नंबरचा सर्वात मोठा रेड लाइट परिसर गणला जातो. दिल्ली, पश्चिम बंगाल येथील रेड लाईट भागानंतर मुंबईतील ग्रँट रोडमधील कामाठीपुरा भागाचा नंबर लागतो. आजघडीला या भागात जवळपास साडेतीन हजारांपेक्षा जास्त महिला देहविक्रय व्यवसायात आहेत. यातील जवळपास 2 हजार महिलांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी आहे. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदान करण्याची संख्या फारच कमी होती. मात्र, दुपारी तीन नंतर कामाठीपुरा भागातील गल्ली नंबर 11, 12, 13 आणि 14 मधील सर्व देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदानाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत आपला मतदानाचा हक्क बजावलाय.

कठीण काळात राजकीय पक्षांची मदत : कोरोनाकाळात कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं होतं. या कठीण काळात ज्या राजकीय पक्षांनी त्यांना मदत केली, अन्नधान्य आणि आवश्यक सेवा पुरवल्या, त्या पक्षांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. या महिलांनी वेळोवेळी मदतीला धावून आलेल्या पक्षांचा विचार करून यंदा मतदानाचा हक्क बजावल्याची प्रतिक्रिया दिलीय. कोरोनाकाळात आम्हाला ज्यांनी आधार दिला, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. आम्हाला ज्यांनी अडचणींमधून सोडवलं, त्याची आठवण ठेवून मतदान केलं, अशी प्रतिक्रिया इथल्या महिलांनी दिलीय.

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान आवश्यक : "आम्ही ज्या पक्षाला मतदान केले, त्यांनी आमच्यासाठी संकटकाळात मदत केली होती. आम्हाला आशा आहे की, ते आता दिलेले आश्वासनही पाळतील," अशी प्रतिक्रिया कामाठीपुऱ्यातील एका महिलेनं दिलीय. तर दुसरी महिला म्हणाली की, "संकटात आम्हाला आधार मिळाला, पण आता रोजच्या आयुष्यात सुधारणा जाणवत नाही. आम्हाला सतत मदतीची गरज आहे. आमच्या आयुष्याकडे समाज वेगळ्या नजरेने पाहतो, पण आम्हाला आमच्या हक्कांची जाणीव आहे. मतदान करून आम्ही दाखवलं की आम्हीही या देशाचे जबाबदार नागरिक आहोत.""लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आमच्या मतांमुळे आमच्या परिस्थितीत बदल होण्याची अपेक्षा आहे," अशी प्रतिक्रियाही एका महिलेनं दिलीय. कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी मतदान करून दाखवले की, त्या देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय आहेत. मुंबईतील उच्चभ्रू वस्ती मानल्या जाणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात केवळ 44.44 टक्के मतदान झालंय, तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात 48.76 टक्के मतदान झालंय. त्यामुळे आता तथाकथित उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित कोण याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे.

महिलांच्या आयुष्यात बदल होणं गरजेचं : या महिला आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी 'अपने आप' ही संस्था 1998 सालापासून कार्यान्वित आहे. या संस्थेच्या पदाधिकारी पूनम अवस्थी यांच्याशी आम्ही बातचीत केली असता त्या म्हणाल्या की, "या महिला जेव्हा येथे येतात, तेव्हा त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्र नसतात. त्यामुळे त्या कुठून आल्या? काय करायच्या? याची सर्व माहिती घेऊन आम्हाला त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यावरून त्यांचं ओळखपत्र बनवावं लागतं. यात बरेच दिवस जातात. मात्र, महानगरपालिका या भागात दरवर्षी दोन कॅम्प लावते आणि त्याच्या माध्यमातून या महिलांची नोंदणी केली जाते. अनेकदा बांगलादेश, श्रीलंका या भागातून महिला येतात. त्यावेळी त्यांची कागदपत्र तपासणी करणे यात एक वर्षाचा देखील कालावधी जातो. या महिलांच्या आयुष्यात बदल होणं गरजेचं आहे, असंही पूनम अवस्थी म्हणाल्यात.

हेही वाचा-

  1. अदानींकडून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीसह भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधींची लाच, अमेरिकेत गंभीर आरोप
  2. गौतम अदानी अमित शाह यांची बैठक, मात्र त्यात शरद पवार नव्हते; संजय राऊतांचा दावा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.