ETV Bharat / state

रस्त्यावर आढळली शेकडो मतदान कार्ड; बनावट असल्याचा संशय, गुन्हा दाखल - loksabha election 2024

Voter ID Card Found On Road कल्याण पूर्वेतील पिसवली गावामध्ये गोणी भरुन मतदान कार्ड मिळाल्यामुळे नागरिक तसंच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच विश्वास गुजर यांनी मतदान ओळखपत्रं बेवारस रित्या आढळ्याच्या कारणावरुन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली.

Voter ID Card
रस्त्यावर मिळालेले मतदान ओळखपत्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 12:05 PM IST

Updated : Jun 22, 2024, 2:38 PM IST

ठाणे Voter ID Card Found On Road : कल्याणमधील पिसवली गावामध्ये गोणी भरुन मतदान कार्ड मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गोणीमध्ये असलेली ओळखपत्रं ही कल्याण पूर्व भागातील आहेत. निवडणुकीमध्ये येथील नागरिक आपल्या मूळ राज्यात गेले. त्यामुळे बनावट मतदान कार्ड तयार करुन निवडणुकीमध्ये त्याचा वापर केल्याचा संशय येथील नागरिक करत आहेत. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी पदाधिकाऱ्यांसह मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिली. यावेळी त्यांनी संशय व्यक्त करत लोकसभा निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी केली आहे. यामुळे राजकारण तापलं आहे.

माहिती देताना मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर (ETV Bharat)

कल्याण लोकसभेमधील पिसवली गावामध्ये गोणी भरुन मतदान कार्ड मिळाली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन २१ जून रोजी भादंवि कलम १८८, ३७९, ४२७ आणि लोकप्रतिनिधी अधिनियमाचे कलम १२३,१३४, व १३६ (१) अन्वेय गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अधिकाऱ्यांना नोटीस : शिवाय विश्वास गुजर यांनी मतदान ओळखपत्रं बेवारसरित्या आढळल्याच्या कारणावरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रमांक 19 नेतेवली येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO), उपायुक्त सामान्य प्रशासन कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग ठाणे, सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग ठाणे मनपा, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या विरोधात नोटीस बजावण्यात आल्यानं अधिकाऱ्यांवर टांगती तलवार आहे.

काय आहे प्रकरण : दोन दिवसांपूर्वी कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गाव हद्दीत रस्त्यावर एका पोत्यात भरलेली शेकडो मतदारांची ओळखपत्रं रस्त्यावर फेकलेली आढळून आली होती. बहुतांशी मतदार ओळखपत्रं कल्याण पूर्व भागातील नेतिवली, पिसवली, चक्कीनाका भागातील रहिवाशांची असल्याचं समोर आलं. घटनेच्या दिवशी मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्रं ताब्यात घेऊन या मतदान ओळखपत्रांची सत्यता, ही ओळखपत्रं रस्त्यावर कोणी आणून फेकली. अलीकडं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार ओळखपत्रांचा वापर झाला आहे का, या दिशेनं तपास सुरू केला.

सुरुवातीला शिळफाटा रस्त्यावरुन धावणाऱ्या एखाद्या वाहनातून ही पिशवी पडली असल्याचं पादचाऱ्यांना वाटलं. परंतु, एका पादचाऱ्यानं या पिशवीत काय आहे, हे पाहण्यासाठी ती पिशवी उघडली. त्यामध्ये मतदान ओळखपत्रं दिसली. ही ओळखपत्रं फेकण्यात काहीतरी गडबड दिसते, त्यामुळे संबंधित पादचारी तेथून निघून गेला. आताच निवडणुका पार पडल्या आहेत. ही मतदान ओळखपत्रं बनावट निघाली तर आपल्याला नाहक चौकशीला सामोरं जावं लागेल, या भीतीनं कोणीही नागरिक या मतदान ओळखपत्रांच्या पिशवीजवळ गेला नाही. काही नागरिकांनी ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी रस्त्यावर पडलेली ओळखपत्रं जमा केली.

लोकसभा निकाल : लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण मतदासंघाकडं होतं. कारण यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर यांच्यात जोरदार लढत होऊन यात श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी २ लाखापेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. आता बनावट ओळखपत्रं आढळल्यानं पुन्हा एकदा कल्याण मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा

  1. आमदार अपात्र ठरले तर त्यांचं मतदान विधान परिषद निवडणुकीत ग्राह्य की बाद? काय सांगते घटना? - Vidhan Parishad Election 2024
  2. निवडणूक आयोगाने मतदार यादीतून १२ हजार नावे वगळली, ॲड. अनिल परब यांचा आरोप - Anil Parab On Election Commission
  3. 'ठाकरेंचा विजय ही तात्पुरती आलेली सूज, त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात - Eknath Shinde Speech

Last Updated : Jun 22, 2024, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.