नवी दिल्ली loksabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (16 मार्च) नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यावेळी राजीव कुमार यांनी निवडणुकीची तयारी आणि मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांची देखील माहिती दिली.
मुख्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा : लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी एक मोठी घोषणा केली. देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच निवडणूक आयोग हे लोकांच्या घरी जाऊन मतदान घेणार आहे. राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींचं वय 85 वर्षांपेक्षा जास्त आहे, तसंच ज्यांना 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे, अशा व्यक्तींच्या घरी जाऊन आयोगाचे कर्मचारी त्यांचं मत घेतली. अशा व्यक्ती फॉर्म डीच्या माध्यमातून मत देऊ शकतील, असंही त्यांनी सांगितलं.
राजीव कुमार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
- देशात 97 कोटींपेक्षा जास्त मतदार
- 96.8 कोटी मतदार मतदान करणार
- दीड कोटी निवडणूक अधिकारी
- साडेदहा लाख पोलींग बूथ
- 55 लाखांपेक्षा अधिक EVM मशीन चा वापर केला जाणार
- 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करणार
- 82 लाख प्रौढ, 48 हजार तृतीयपंथ, 49.7 पुरुष, 47.1 महिला मतदान करणार
- देशात साडेदहा लाखांपेक्षा अधिक मतदान केंद्र
- 100 वर्षांपेक्षा जास्त दोन लाख मतदार
- महिलांसह तरुण मतदारांमध्येही वाढ
- तरुण केवळ मतदान करणार नाहीत तर अॅम्बेसेडरही बनतील
- प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची सोय
- पोलिंग बूथवर येऊ न शकणाऱ्यांसाठी घरोघरी मतदानाची सोय (85 वर्षांच्या वर वय असणारे)
- दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सुविधा
- मतदारांसाठी ऑनलाईन माहितीची सुविधा
- उमेदवारांची माहितीही ऑनलाईन मिळणार
हेही वाचा -