ETV Bharat / state

मशाल पेटली! भाऊसाहेब वाघचौरेंना साईबाबा पावले; शिर्डीतून सदाशिव लोखंडेंचा पराभव - Shirdi Lok Sabha Results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 1:25 PM IST

Updated : Jun 4, 2024, 2:48 PM IST

Shirdi Lok Sabha Election Results 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Results 2024) सदाशिव लोखंडे (शिंदे गट) विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) विरुद्ध उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी) अशी तिरंगी लढत झाली होती. अखेर शिर्डीचा निकाल जाहीर झाला असून ठाकरे गटाचे नेते भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure Win) हे विजयी झाले आहेत.

Shirdi Lok Sabha Constituency Election Results 2024
शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल (Source ETV Bharat)

शिर्डी Shirdi Lok Sabha Election Results 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Results 2024) शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure Win) मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (शिंदे गट), माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत बघायला मिळाली होती. तसंच मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून वाकचौरे आघाडीवर असल्याचं बघायला मिळालं.

भाऊसाहेब वाकचौरे कोण आहेत? : भाऊसाहेब वाकचौरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेतील. प्रशासकीय सेवेत असताना सात वर्ष साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी असल्यानं त्यांचा दांडगा जनसंपर्क झाला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेबांनी रामदास आठवले यांना पराभवाची धूळ चारली. मात्र, लगेचच पुढच्या म्हणजेच 2014 च्या निवडणुकीत शिवबंधन झुगारुन त्यांनी काँग्रेसचा हात धरला. 2014 साली शिर्डी लोकसभा काँग्रेसकडून लढवली. मात्र, मोदी लाटेत युतीच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून वाकचौरेंना पराभव स्वीकारावा लागला. निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्यानंतर भाऊसाहेबांनी तेव्हाच भाजपाचं कमळ हाती घेतलं. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव असल्यानं तेथून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, खासदारकीनंतर पुन्हा आमदारकीतही त्यांना अपयश आलं. पुढं 2019 ला भाऊसाहेबांनी शिर्डी लोकसभा अपक्ष लढवली, पण तिथंही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बघायला गेलं तर शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि आता पुन्हा ठाकरे गट असा वाकचौरे यांचा एकंदरीत राजकीय प्रवास आहे.

निळवंडे धरणाच्या कालव्याच्या मंजुरीचा प्रश्न मार्गी लावण्यातही वाकचौरे यांचा मोठा हातभार आहे. शिर्डीतील साई मंदिराचं कामकाज पाहात असल्यापासून त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिक विस्तारल्या होत्या. त्यातच त्यांच्या जनतेत राहून आपला माणूस म्हणून काम करण्याच्या शैलीमुळं ते लोकप्रिय राजकारणी म्हणून ओळखले जातात.

काँग्रेसच्या रुपवतेंना वंचितची उमेदवारी : शिर्डीमधून शिंदे गटाचे सीटिंग खासदार सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात 'हाय व्हाल्टेज'सामना झाला. मात्र, शिर्डीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलीय होती. कारण उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसचा 'हात' सोडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश उमेदवारी मिळवली होती. त्यांच्या प्रवेशानं शिर्डीचं राजकीय गणित बदललं होतं. मात्र, या चुरशीच्या लढतीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी विजय मिळवला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल :

वर्ष - 2019 : सदाशिव लोखंडे (विजयी उमेदवार- शिवसेना) 47.29% मतं

वर्ष - 2014 : सदाशिव लोखंडे (विजयी उमेदवार- शिवसेना) 57.14% मतं

वर्ष - 2009 : भाऊसाहेब वाकचौरे (विजयी उमेदवार- काँग्रेस) 54.21% मतं

हेही वाचा -

  1. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची आघाडी, सांगली लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? - Lok Sabha election results 2024
  2. पालघरमध्ये कोण उधळणार विजयी गुलाल? - Lok Sabha Election Results 2024
  3. अमरावतीत 37 उमेदवार रिंगणात, 19 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार निकाल - Lok Sabha Election 2024

Last Updated : Jun 4, 2024, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.