छत्रपती संभाजीनगर Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी भाजपा आध्यात्मिक आघाडी सरसावली आहे. पुढील पंधरा दिवस जवळपास पाच हजार सदस्य राज्यातील वेगवेगळ्या मंदिर, मठ येथील साधू महंत आणि कीर्तनकार यांच्या भेटी घेणार आहेत. इतकंच नाही तर त्यांना भाजपाच्या विजयासाठी साकडं देखील घालणार आहेत. "मागील दहा वर्षात केंद्र सरकारनं केलेलं काम उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनंदनाचा आम्ही ठराव घेतला असून त्याची माहिती सर्वत्र देणार आहोत," अशी माहिती भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दोन ठराव : भाजपा आध्यात्मिक आघाडीची प्रदेश बैठक नियमित होते. त्यात मराठवाड्यात बैठकीतच आयोजन करण्यात आलं होतं. यात दोन ठराव संमत करण्यात आले. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या मते, रामराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी शुभेच्छा आणि त्यांनी दहा वर्षात विकासाची गंगा प्रवाहित केली. यामुळे रांगेतल्या शेवटच्या घटकाचं कल्याण होत आहे. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देण्याबाबत हे ठराव आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातील तिथे साधू-संत यांचा सन्मान करतात. यामुळे त्यांच्याबद्दल साधु संतामध्ये प्रेम आहे. उद्यापासून आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी साधू-संतांचा आशीर्वाद घेतील. काही ठिकाणी त्यांच्याशी गाठ भेट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे संबंध महाराष्ट्रातून त्यांना आशीर्वाद दिला पाहजे, अशी भावना भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी व्यक्त केली.
जातीयवाद मिटवण्याचा प्रयत्न : महाराष्ट्रात फोफावलेला जातीयवाद मिटवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रात जातीय सलोखा रहावा, यासाठी आरक्षणाच्या विषयावरुन चळवळी सुरू झाल्या. त्यांना न्याय अधिकार मिळाला पाहिजे, या भूमिकेशी सहमत आहे. परंतु प्रत्येक जातीनं आपले अधिकार संवैधनिक पद्धतीनं मागायला हवेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून एकमेकांची जात काढली जाते, घरं पेटवली जातात, दंगली, जीवे मारण्याच्या धमक्या, राजकीय नेत्यांची जात काढली जाते, या सर्व घटनांचा निषेध करण्यात आला आहे. कोणत्याही अन्य जातीचा तिरस्कार करणं, नेत्याला जातीवरुन बोलणं, याचा आपण निषेध करतो. महाराष्ट्रात विखारी जातीवाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यात विराट संघ संमेलन घेतलं जाणार आहे, अशी माहिती देखील भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या आचार्य तुषार भोसले यांनी दिली.
हेही वाचा :