ETV Bharat / state

लाडका श्वान वाचवताना रेल्वेच्या धडकेत वकिलाचा मृत्यू, श्वानानंही सोडला प्राण - Lawyer Dies While Save Pet Dog

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 11:14 AM IST

Lawyer Dies While Save Pet Dog : आपल्या लाडक्या श्वानाना रेल्वे ट्रॅकवर वाचवताना रेल्वेच्या धडकेत वकिलाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना संग्रामनगर परिसरात घडली. या घटनेत श्वानाचाही मृत्यू झाला आहे. श्वानाला वाचवताना अ‍ॅड भाऊसाहेब लांडगे या वकिलाचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Lawyer Dies While Save Pet Dog
अ‍ॅड भाऊसाहेब लांडगे (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Lawyer Dies While Save Pet Dog : पाळीव श्वानांना अनेक जण कुटुंबीय समजून जीव लावतात. त्यांच्यासाठी आपला जीव देखील अडचणीत आणण्यासाठी मागंपुढं पाहत नाहीत. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. आपल्या लाडक्या श्वानाला वाचवताना रेल्वेच्या धडकेत वकिलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संग्रामनगर उड्डाण पुलाजवळ घडली. अ‍ॅड भाऊसाहेब लांडगे असं श्वानाला वाचवताना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या वकिलाचं नाव आहे. या घटनेत श्वानाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रेल्वेची धडक बसल्यानं वकील भाऊसाहेब लांडगे हे जवळपास 15 फूट लांब फेकले गेले. त्यांच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाल्यानं घटनास्थळी मृत्यू झाला. आपल्या श्वानाचा जीव वाचवण्यासाठी मालकानं आपला प्राण गमावला, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Lawyer Dies While Save Pet Dog
अ‍ॅड भाऊसाहेब लांडगे (Reporter)

श्वानांसह रोज जात होते फिरायला : वकील भाऊसाहेब लांडगे हे रोज काम आटोपून घरी आल्यानंतर त्यांच्याकडं असलेल्या दोन श्वानांना घेऊन फिरायला जात होते. 2 ऑगस्टच्या रात्री आठच्या सुमारास नित्यनियमानं ते संग्राम नगर परिसरात रेल्वे रुळाजवळून जात होते. यावेळी त्यांच्याकडं असलेल्या पिटबुल जातीच्या श्वानानं रेल्वे पटरीकडं धाव घेतली. पटरीवर तो गेला असता, मागून रेल्वे येत असल्याचं पाहून भाऊसाहेब लांडगे यांनी तिकडं धाव घेतली. मात्र रेल्वे खूप जवळ आल्यानं ते जागेवर थांबले. त्यामुळे त्यांना रेल्वेची जोरात धडक बसली. रेल्वेची जोरदार धडक बसल्यानं भाऊसाहेब लांडगे हे पंधरा फूट लांब उडाले. यावेळी डोक्यावर पडल्यानं त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला, तर पाठीला आणि शरीरावर इतर ठिकाणी देखील गंभीर जखमा झाल्या. त्या ठिकाणी असलेले स्थानिक रहिवासी श्रीमंत गोरडे आणि इतर नागरिकांनी त्यांना तातडीनं घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं.

श्वानाचाही झाला मृत्यू : वकील भाऊसाहेब लांडगे हे पिटबुल जातीच्या श्वानाला वाचनासाठी धावले, त्या श्वानाचा देखील रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांच्याकडं असलेला दुसरा श्वान बचावला आहे. आपल्या लाडक्या श्वानाला वाचवण्यासाठी भाऊसाहेब लांडगे यांनी आपला प्राण पणाला लावला, मात्र यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊसाहेब लांडगे गंगापूर तालुक्यातील रहिवासी आहेत, त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. मोठा मुलगा अभियंता आहे, तर छोटा मुलगा देखील त्यांच्यासारखा वकिली शिक्षण घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच निकटवर्तीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.