ETV Bharat / state

सलमान खान गोळीबार प्रकरणाची अनमोल बिश्नोईनं स्विकारली जबाबदारी; गोळीबार करतानाचं सीसीटीव्ही आलं समोर - Salman Khan Firing Incident - SALMAN KHAN FIRING INCIDENT

Salman Khan Firing Incident : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानच्या (Salman Khan Firing) घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईनं (Anmol Bishnoi) घेतली आहे. दरम्यान, दोन तरुण बाईकवरुन येत गोळीबार करत असल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय.

Salman Khan
अभिनेता सलमान खान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 5:15 PM IST

Updated : Apr 14, 2024, 8:20 PM IST

मुंबई Salman Khan Firing Incident : बॉलिवूड स्टार अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील बांद्रा येथील घराबाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या सीमेबाहेर जी वाहने जात आहेत, त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, दुसरीकडं या गोळीबारानंतर काही तासातच या हल्ल्याची जबाबदारी अनमोल बिश्नोई गँगनं (Anmol Bishnoi) स्विकाल्याची माहिती समोर येत आहे. तसा दावा अनमोल बिश्नोई यानं सोशल मीडियावर केलाय.

खानला जीवे मारण्याची धमकी : अभिनेता सलमान खान याला मागील वर्षी देखील जीवे मारण्याची धमकी आली होती. तसेच मेलद्वारे आणि चिठ्ठीद्वारेही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी आली होती. 1998 साली राजस्थानमध्ये 'हम साथ साथ हैं' या सिनेमाचे चित्रीकरण करत असताना सलमाननं काळ्या काळविटाची शिकार केली होती. काळ्या काळवीटाला बिश्नोई समाज पवित्र मानतात. या प्रकरणी सलमानला तुरुंगवास देखील झाला होता. मात्र, याचा राग बिश्नोई समाजामध्ये आहे. याआधी बिश्नोई गँगनं सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, यानंतर आता या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोई याने स्विकारले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू : अनमोल बिश्नोई याने याची जबाबदारी स्विकारली आहे. अनमोल बिश्नोई या नावाने फेसबुकवर पोस्ट करण्यात आली. या पोस्टमधून सलमान खानच्या घरी आपण गोळीबार केला, असं यात म्हटलंय. तसेच सलमान खानला धमकी वजा इशारा देखील या पोस्टमधून देण्यात आलाय. मात्र, अनमोल बिश्नोई या फेसबुक अकाउंटचा पूर्व इतिहास पाहता या पोस्ट व्यतिरिक्त यापूर्वी कुठल्याही अशा प्रकारच्या पोस्ट पोलिसांना दिसल्या नाहीत. त्यामुळं अनमोल बिश्नोई हीच गोळीबार करणारी व्यक्ती आहे का? याबाबत पोलिसांकडून सत्यता तपासण्यात येत असून, हा व्यक्ती कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Salman Khan Firing Incident
अनमोल बिश्नोईनं पोस्ट केली शेयर

मुंबईत नाकाबंदी : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून, मुंबईत रविवारी सुट्टीच्या दिवशी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. तसेच मुंबई बाहेर जाणाऱ्या गाड्यांचीही कसून तपासणी करण्यात येत असून, गाडीतील लोकांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच सलमान खानच्या घरी पोलिसांची सुरक्षा यंत्रणा वाढवली असून, या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरून चर्चा केली आहे. अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सलमानला आश्वासन दिलं. मात्र, दुसरीकडं या गोळीबारानंतर बिश्नोई गँगवर संशय व्यक्त करण्यात येत होता आणि त्यानंतरच काही तासातच अनमोल बिश्नोई याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. परंतु, अनमोल बिश्नोई यानेच हा गोळीबार केला की अन्य कोणी आहे? याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा -

  1. घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सलमान खानला कॉल, अतिरिक्त सुरक्षा पुरवणार - Salman Khan
  2. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञातांचा गोळीबार, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पोलिसांचा संशय - Salman Khan
  3. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid

Last Updated : Apr 14, 2024, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.