कोलकाता Trainee Doctor RAPE MURDER CASE : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच आहे. सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेनं चौकशीसाठी पाच डॉक्टरांना आज (15 ऑगस्ट) बोलावले आहे. त्याचवेळी बुधवारी आरजी कार रुग्णालयात हल्लेखोरांनी हल्ला केला. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
#WATCH | West Bengal: Medical students in Kolkata stage a protest over Kolkata's RG Kar Medical College and Hospital rape-murder incident. pic.twitter.com/ZQ8AoHMmeD
— ANI (@ANI) August 15, 2024
घटनेचा तपास सीबीआयकडे : सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजी कार हॉस्पिटलचे एमएसव्हीपी संजय वशिष्ठ हे समन्स प्राप्त झाल्यानंतर सीबीआय कार्यालयात हजर झाले. परंतु रुग्णालयातील चेस्ट मेडिसिन विभागाचे दुसरे डॉक्टर अरुणाभ दत्ता चौधरी हे समन्स प्राप्त होऊनही एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले नाहीत. गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेचा सीबीआय तपास करत आहे. मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याबाबत अधिक माहिती गोळा केली जाईल, असं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं. यानंतर सीबीआय रुग्णालयातील नर्सिंग स्टाफला बोलावून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सीबीआयकडून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी कोलकाता पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या सदस्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.
#WATCH | Kolkata: West Bengal CM Mamata Banerjee says, " as far as the information i have, i will not blame the students... the incident is very unfortunate, we still say that they should be hung... we have given all the documents, till the time our police were investigating,… pic.twitter.com/w62x3r4WqG
— ANI (@ANI) August 15, 2024
आरजीसह रुग्णालयात हल्लेखोरांचा हैदोस : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांनी रात्रभर केलेल्या निषेधाच्या कार्यक्रमादरम्यान आरजी कार हॉस्पिटलवर काही जणांनी हल्ला केला. त्यामुळे रुग्णालयात भीतीचं सावट पसरलं. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या एका गटानं रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णालयाच्या आपात्कालीन विभागाची तोडफोड करण्यात आली. उत्तर विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांच्यावरही हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांना किरकोळ दुखापत झाली. गोंधळात सहभागी असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
आरजी कार हॉस्पिटलमधून पुरावे गोळा : आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने तीन सदस्यीय टीम तयार केली आहे. त्यांच्या सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सीबीआय, एसआयटीच्या सदस्यांसोबत सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये बैठक घेतली. तपास प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणाची आणि कशी चौकशी होणार, याची यादी तयार करण्यात आली आहे.
'या' कारणानं संप सुरू ठेवण्याचा निर्णय : आरजी कार कॉलेजमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर निवासी डॉक्टरांची संघटना फोर्डने पुन्हा संपाची घोषणा केली. फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशननं (फोर्ड) गुरुवारी देशभरातील संप तातडीने सुरू करण्याची घोषणा केली. संप पुन्हा सुरू झाल्याची माहिती फोर्डने सोशल मीडियावर दिली. इन्स्टाग्रामवर फोर्डच्या हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, "आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये नुकतीच घडलेली दुःखद घटना आणि सरकारने वेळेवर आश्वासनं पूर्ण न केल्यानं फोर्डनं संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे."
ममता यांच्या राजीनाम्याची मागणी : मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडे आरोग्य आणि गृह मंत्रालय आहे. त्यामुळे सीपीआय (एम) नेतृत्त्वाखालील डाव्या आघाडीनं गुरुवारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. डाव्या आघाडीचे अध्यक्ष बोस यांनी कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मोर्चाने रुग्णालयातील तोडफोड आणि हिंसाचाराचा निषेध केला. त्याचप्रमाणे यातील सर्वांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी केली. बोस म्हणाले की, "या घटनांच्या निषेधार्थ 17 ऑगस्ट रोजी कोलकात्यासह राज्याच्या विविध भागात निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत." दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील तोडफोडीमागे विरोधी राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोप केला.
हेही वाचा :
- कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणी आयुष्मान खुरानानं ऐकवली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ - Murder Case Ayushmann Khurrana
- 'समाजात रानटीपणा असताना कसला स्वातंत्र्याचा उत्सव', कोलकाता डॉक्टर रेप मर्डर केसवर स्टार्सची प्रतिक्रिया - celebs react on kolkata rape case
- कोलकातामधील डॉक्टरच्या हत्या प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,"पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला.." - Rahul Gandhi