ETV Bharat / state

नकली अधिकाऱ्यांच्या टोळीनं व्यापाऱ्याचे लुटले २५ लाख, निवडणुकीच्या धामधुमीत कसा घडला गुन्हा?

निवडणुकीच्या काळात बोगस शासकीय अधिकारी बनत टोळीनं सिनेस्टाईल लूट केली आहे. हा प्रकार मंगळवारी पहाटे घडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Kolhapur crime businessman looted   Rs 25 lakh
प्रतिकात्मक- नकली तपासणी पथकानं व्यापाऱ्याचे लुटले २५ लाख (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2024, 11:35 AM IST

Updated : Nov 13, 2024, 12:50 PM IST

कोल्हापूर: राज्यात एका बाजूला विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी पोलिसांपासून शासकीय यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली आहे. असे असताना दुसऱ्या बाजूला पोलीस व्यस्त असल्याचा फायदा आता काही लुटारू टोळी घेताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यात प्रवेशद्वारावर निवडणूक आयोगाकडून तपासणी पथक उभे करण्यात आलं आहेत. याचा फायदा एका लुटारू टोळीनं घेतला.

शासनाच्या तपासणी पथकांकडून सुरू असलेल्या तपासणीची हुबेहूब नक्कल करून शासनाच्या तपासणी नाक्याच्या आधीच काही अंतरावरच बोगस पथकानं एका व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रोकड लांबविली आहे. हा प्रकार काल मंगळवारी (दि. १२) रोजी पहाटे पुणे-बंगळुरू महामार्गाजवळ असलेल्या तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. माहिती कळताच पोलिसाची 5 पथके संशयितांचा शोध घेण्याकरिता रवाना करण्यात आले आहेत.

बोगस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला लुटले (Source- ETV Bharat Reporter)

असा घडला गुन्हा-पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, शाहूपुरी, कोल्हापूर) हे व्यापारी आहेत. ते यात्रेत पाळणे लावण्याचा व्यवसाय करतात. ते रोजच्या प्रमाणे सोमवारी काम केलेल्या कामाची रक्कम घेऊन मंगळवारी पहाटेच्या ५ ते ५:२० च्या सुमारास कारमधून तावडे हॉटेलच्या दिशेने आले. पहाट असल्यानं अजून अंधार होता. दरम्यान, २५ ते ३० वयोगटातील अज्ञात पाच जणांच्या टोळीने सुटबुट घालत आणि शासकीय अधिकाऱ्यांचे नकली ओळखपत्र गळ्यात अडकवून सर्व्हिस रोडला हारणे यांची कार अडवली. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याचे सांगत कारची तपासणी करणार असल्याचे सांगितले. दोघा-तिघांनी कारची झडती सुरू केली. त्यावेळी गाडीत २५ लाख ५० हजार रुपये ठेवलेली बॅग बोगस अधिकाऱ्यांच्या हाती लागली.

रोकड आणि मोबाइल काढून पसार- आचारसंहिता काळात एवढी रक्कम तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असे सांगून त्यांनी कारवाईची भीती दाखवली. हारणे यांनी त्यांना हे आपल्या व्यवसायाचे पैसे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या टोळक्याने त्यांना आपल्या कारमध्ये बसवून ते सरनोबतवाडीच्या दिशेने घेऊन गेले. तिथे त्यांच्याकडील रोकड आणि मोबाइल काढून घेऊन पसार झाले. या सर्व घटनेनंतर आपली फसवणूक झाल्याचे हारणे लक्षात येताच त्यांनी थेट गांधीनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेली हकीकत सांगून तक्रार दाखल केली.

पोलीस दलात खळबळ-जिल्ह्यात दीडशेहून अधिक तपासणी पथके शहरांच्या वेशीवर २४ तास काम करत आहेत. तावडे हॉटेल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारावरच एक अधिकृत स्थिर तपासणी पथक आहे. मात्र त्याच्या अलीकडेच महामार्गाच्या पलीकडेच सर्व्हिस रोड लगत तिथून थेट बोगस शासकीय अधिकारी बनत तोतया टोळीने केलेल्या सिनेस्टाईल या लुटीमुळे पोलीस दलात आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. गांधीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी तपासाच्या सूचना देत गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पाच पथके तपासासाठी रवाना झाली. मात्र, या लूटमारच्या प्रकारामुळे सध्या व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संशियत कोल्हापुरातीलच असल्याचा अंदाज- पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी संशयित गाडीची ओळख पटली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगितले. गाडी आणि लूट करणारी टोळीतील संशयितदेखील कोल्हापुरातीलच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच एलसीबी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा अन्वेषणची टीम वेगानं तपास करत आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून फूटेज ताब्यात घेण्यात आले आहेत.

हेही वाचा-

  1. नवी मुंबईतील रो-हाऊसवर पोलिसांचा छापा, हाती लागले तब्बल 'इतके' कोटी रुपये
  2. भिवंडीत वाहन तपासणीवेळी आढळली २ कोटी ३० लाख रुपयांची रोकड, भरारी पथकानं केली जप्त
  3. साताऱ्यात क्रेटा कारमधून १ कोटीची रोकड जप्त, रक्कम नेमकी कुणाची? तपास सुरू

Last Updated : Nov 13, 2024, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.