ETV Bharat / state

केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; वक्फ बोर्डाच्या मदतीवर आक्षेप - Ketaki Chitale aggressive video

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 10:34 PM IST

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये केतकीने थेट महायुती सरकारवर टीक केलीय. आता तुम्हाला हिंदूंची मते नकोत का, असा सवालही राज्यसरकारला केलाय. वक्फ बोर्डाबाबत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयावर तिनं जोरदार आगपाखड केली.

Ketaki Chitale
अभिनेत्री केतकी चितळे (ETV BHARAT Reporter)

मुंबई Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते. अलीकडेच तिनं महाराष्ट्र सरकारवर टीका करणारा एक जोरदार व्हिडिओ शेअर केला आहे. देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी तिनं विरोधकांवर टीका केली होती. यानंतर आता केतकीनं राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य शासनानं वक्फ बोर्डसाठी 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावरून केतकीने राज्य सरकारला धारेवर धरलंय. 'तुम्ही स्वतः बधिर आहात, की आम्हाला बधिर करणार आहात', असा संतप्त सवाल तिनं उपस्थित केला आहे. तसंच लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान कसा असावा यासाठी आम्ही मतदान केलं. परंतु विधानसभा निवडणुकीत तीन तिघाडी आणि काम बिघाडी, अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं तिनं म्हटलं आहे.

वक्फ बोर्डला खतपाणी : लोकसभा निवडणुकीत ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही, त्यानाच तुम्ही मदत करत आहात. त्यांना बळकट करण्यासाठी तुम्ही दहा कोटी रुपये कसं काय मंजूर केले? असा सवाल केतकीनं राज्य सरकारला विचारला आहे. देशात वक्फ बोर्ड नको म्हणून देशात विविध ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. याच वक्फ बोर्डला तुम्ही कसं काय खतपाणी घालू शकता?. त्यांच्यासाठी कशी काय आर्थिक मदत करू शकता? अशी संतप्त भावना केतकीनं व्यक्त केलीय.

कोणता झेंडा घेऊ हाती? : तीन तिघाडी सरकारमध्ये आतापासूनच मतभेद असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेत हे मोठ्या प्रमाणात दिसून येईल. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण कोणाला मत द्यायचं?, कोणाला नाही? असा प्रश्न निर्माण होणार आहे. नोटाला मत देणं चुकीचं आहे. परंतु तुम्ही जर असंच वागणार असाल तर माझं मत शंभर टक्के नोटालाच असेल, असं केतकीनं म्हटलं आहे. तसंच विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोणता झेंडा घेऊ हाती? असा प्रश्न लोकांना पडणार आहे.

मग दाद कुठे मागणार? : देशात भारत सरकारनंतर सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडं आहे. अशाच एका संस्थेला तुम्ही 10 कोटीची मदत केली आहे. याचं तुम्हाला भान आहे का? वक्फ बोर्डनं घेतलेल्या निर्णयावर तुम्ही उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टात देखील दाद मागू शकत नाही. मग दाद कुठं मागणार?. वक्फ बोर्डच्या मदतीसाठी राज्य सरकार धावलं, याचं आश्चर्य वाटतेय.

मुस्लिम राष्ट्र घोषित करा : राज्यात अशीच परिस्थिती असल्यास सर्व काही हिंदूच्या विरोधात काम होईल. त्यामुळं महाराष्ट्र राज्याचं पश्चिम बंगाल व्हायला फार वेळ लागणार नाही. बंगालमध्ये बांग्लादेशी घुसखोरी करत आहेत. मुंबईतील मानखुर्दमध्ये मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी मुसलमान राहत आहेत. महाराष्ट्रात रोहिंग्ये आमच्या डोक्यावर बसवत आहेत. त्यामुळं एकदाचं या देशाला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषित करा, असा हल्लाबोल केतकीनं सरकारवर केला आहे.

हे वाचलंत का :

  1. मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश - Raj Thackeray on Assembly Election
  2. "महाविकास आघाडीला विधानसभेत..."; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार, संघाच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार - Chandrashekhar Bawankule
  3. राज्यात मुस्लिम आरक्षणासाठी 'एनडीए'च्या घटक पक्षांकडून वाढला जोर; भाजपाचा थेट विरोध? - Muslim Reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.