मुंबई Jyeshtha Gauri Avahana 2024 : यंदा दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांचं थाटामाटात आगमन झालं असून, आता गणपतीपाठोपाठ गौराईचं आगमन होणार आहे. गौराईचे मुखवटे आणि गौराईला सजवण्यासाठी लागणारे दागिने तसेच रेडीमेड नऊवारी साडी खरेदीसाठी भाविकांची लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे.
गौरी पूजन वेळ : यंदा मंगळवारी, 10 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन होणार आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केलं जाणार आहे. तसेच गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरीचं विसर्जन होणार आहे.
यंदा फेटांच्या गौराईंचा ट्रेंड : यंदा 'फेटा' परिधान केलेल्या गौराईचं खास आकर्षण असल्याचं दिसून येत आहे. अगदी वीस रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत गौराईचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने देखील लालबागमधील चिवडा गल्लीत असलेल्या 'न्यू हनुमान थेटर गल्ली'त उपलब्ध आहेत.
विविध अलंकार खरेदीसाठी उपलब्ध : लालबाग मार्केटमध्ये दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, बाजूबंद, तोडे, बांगड्या, नथ, ठुशी, चंद्रकोर, साखळ्या, कंबरपट्टा, बिंदी, पैंजण, कृत्रिम फुलांचे गजरे-वेण्या अशी वैविध्यता आहे. या दागिन्यांची किंमत 200 रुपयांपासून ते अगदी 600 रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याची माहिती चिवडा गल्लीतील विक्रेत्यानं दिली. त्याचप्रमाणं अगदी 20 रुपयांपासून ते थेट एक ते दोन हजार रुपयांपर्यंत गौराईला सजवण्यासाठी नथीपासून ते हार, कंबरपट्टा असे नानाविध अलंकार खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा -
- पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 'स्त्री शक्ती'चा जागर; 35 हजार महिलांचं अथर्वशीर्ष पठण अन् महाआरती - Ganeshotsav 2024
- 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात बाप्पाचं ठिकठिकाणी आगमन; पाहा व्हिडिओ - Ganesh Chaturthi 2024
- गणेशोत्सव 2024; नवसाला पावणारा नागपूरचा "टेकडी गणपती", 350 वर्षांचा आहे इतिहास - Ganeshotsav 2024