ETV Bharat / state

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections

Sandeep Shelke Nomination : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

Sandeep Shelke Nomination
संदीप शेळके उमेदवारी अर्ज दाखल करताना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 11:02 PM IST

बुलढाणा Sandeep Shelke Nomination : संदीप शेळके यांच्याकडून बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली. खरं तर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेवढीच नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संदीप शेळकेंचा आरोप : वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे. जिथे जिल्ह्याचे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते. आपापल्या जिल्ह्याचे सर्वांगीण सर्वव्यापी विकास करायचा आहे. यावेळी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर संदीप शेळके यांनी टीका केली आहे. त्यांनी संसदेत सोयाबीन, कापसावर प्रश्न विचारले नाही. जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल ते बोलत नाहीत. त्यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत नाहीत किंवा भूलथापा मारायच्या भावनिक राजकारण करायचं आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शिकून घ्यायची, असं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं. त्यामुळे गेल्या 15 वर्षांत जिल्ह्यात 50 वर्षे मागे नेण्याचं पाप त्यांनी प्रतापरावांनी केलं असेही संदीप शेळके म्हणाले.

शेळकेंनी मागितले मतांचे दान: आता लोक प्रस्थापित पुढाऱ्यांना कंटाळले असून आता वन बुलढाणा मिशनचा आवाज दिल्लीत पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. शेतकऱ्यांची सिंचन पादंण रस्ते, जिल्ह्यात एमआयडीसी तरुणांना रोजगार, महिला सक्षमीकरण, गाव गावी रनिंग ट्रॅक, क्रीडा या मुद्द्यावर आता निवडणूक होणार आहे. जनतेने मतांचे दान आपल्याला द्यावे. तुमचा प्रत्येक मताचा हिशोब येईल असं संदीप शेळके म्हणाले. सभेनंतर संदीप शेळके यांनी भव्य रॅली काढत संगम चौक, जस्तम चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, मार्गे हे मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला.

हेही वाचा:

  1. श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंची खेळी, 'या' महिला उमेदवाराला कल्याण-डोंबिवली मतदारसंघात उमेदवारी - Lok Sabha Election 2024
  2. एक खासदार पडला तर फरक पडत नाही, रायगडचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक - LOK SABHA ELECTION 2024
  3. खऱ्या भाजपावाल्यांनी फक्त सतरंज्याच टाकायच्या का? बच्चू कडूंचा सवाल; बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू संतापले - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.