ETV Bharat / state

बल्लारपूर तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला; दहा महिन्यात पाच वाघांचा मृत्यू - Human vs Wildlife Conflict - HUMAN VS WILDLIFE CONFLICT

Human vs Wildlife Conflict : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुका देखील प्रकाशझोतात आला आहे. मागील दहा महिन्यांमध्ये पाच वाघांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या वनपरिक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे.

Human vs Wildlife Conflict
वाघांचा मृत्यू (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 9:33 PM IST

वाघांच्या मृत्यूबाबत सांगताना दिनेश खाटे (Reporter)

चंद्रपूर Human vs Wildlife Conflict : चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये जितके वाघ आहेत त्यापेक्षाही अधिक वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यातील इतरत्र जंगलात विखुरलेले आहेत. ब्रह्मपुरी तालुका यात अग्रणी आहे. इथे या वाघांची संख्या वाढल्याने मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे येथील वाघांना स्थानांतरित करण्याचा प्रयोग देखील प्राथमिक स्तरावर सुरू आहे.

बल्लारपूर वनपरिक्षेत्र का आलंय प्रकाशझोतात? बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक विभागात जिथे एकसमान जंगल नसून ते विखुरलेले जंगल असते असे जंगल प्रादेशिक वनपरिक्षेत्र अंतर्गत येते; मात्र हे जंगल वन्यजीवांचे स्थलांतर करण्यासाठी लागणाऱ्या कॉरिडॉरमध्ये येतं. त्यामुळे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाण्यासाठी वाघ तसेच इतर वन्यजीव याच मार्गाचा अवलंब करतात; परंतु या परिसरात गावे असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा देखील धोका असतो. मागील दहा महिन्यात बल्लारपूर वनपरिक्षेत्राअंतर्गत पाच वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील काही मृत्यू हे भक्ष्य न मिळाल्याने झाले असल्याने या चिंतेत आणखी भर पडली आहे. तर याच दरम्यान वाघाच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

वाघांच्या मृत्यूच्या घटना : 29 जुलै 2023 ला बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपवनपरिक्षेत्र येथे वाहनाच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला होता. 7 सप्टेंबर 2023 ला याच परिसरात दोन बछडे मृतावस्थेत तर एक बछडा अशक्त अवस्थेत आढळून आला होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला होता. वाघिणीपासून दुरावल्यामुळे भूकेमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. बुधवारी 8 मे रोजी याच क्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. अशा प्रकारे पाच वाघांचा या दहा महिन्यांत मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे.

वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू : 7 जानेवारीला कारवा जंगलात वाघाने एकाला ठार केले. यानंतर 27 फेब्रुवारीला 51 दिवसानंतर आणखी एका व्यक्तीचा यात मृत्यू झाला. 14 मार्चला आणि 14 एप्रिलला या वाघाने आणखी दोघांना ठार केले.

अखेर तो वाघ जेरबंद झाला : 'रॉकेट' हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून मोहुर्ली बफर क्षेत्रात दाखल झाला. तिथून 'वाघडोह' ह्या वाघाच्या क्षेत्रातसुद्धा त्याचा वावर होता. 'रॉकेट' हा वेकोलिच्या खदानीतसुद्धा वास्तव्यास होता. तिथून तो मामला क्षेत्रातून जुनोना क्षेत्रात चंद्रपूर-मूल महामार्ग आणि बल्लारशाह-गोंदिया रेल्वे लाईन हे मोठे अडथळे पार करून मध्य-चांदाच्या बल्लारशा क्षेत्रात दाखल झाला. इथे त्याने माणसावर हल्ले सुरू केले. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचे आदेश काढण्यात आले. हा मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग काय प्रयत्न करीत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा:

  1. मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठी कलाकार मूग गिळून गप्प का? काय आहेत कारणे? - Renuka Shahane On Marathi Artist
  2. अरविंद केजरीवाल यांना 'सुप्रिम' दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन, लोकसभेचा प्रचारही करणार - Interim Bail To Arvind Kejriwal
  3. छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 12 नक्षलवाद्यांचा खात्मा - encounter in pedia forests

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.