मुंबई Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) माध्यमातून रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. या योजनेचा अर्ज 31 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत. त्यामुळे राज्यभर अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी दोन हप्त्यांचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. मात्र ऑनलाईन पद्धताने जे अर्ज दाखल केलेत ते अप्रूव्ह झाले की, रिजेक्ट हे कसं तपासायचं? याबाबत महिलांमध्ये गोंधळ आहे. अर्ज तपासण्याच्या बाबतीत जर तुम्ही संभ्रमात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा...
अर्ज कसा तपासणार? : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' या योजनेचे 'नारीशक्ती दूत' ॲपच्या (Nari Shakti Doot App) माध्यमातून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या ॲपच्या माध्यमातून तुमचा अर्ज तपासू शकता. ॲप ओपन केल्यानंतर 'यापूर्वी दाखल केलेले अर्ज' यावर जर तुम्ही क्लिक केल्यानंतर आपण जो अर्ज भरला आहे त्याचा तपशील तुम्हाला समोर दिसेल. त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूव्हड? रिजेक्टेड? की पेंडिंग? याचा तपशील समोर दिसेल.
कारण काय? : जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळं रिजेक्ट केलाय?, जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर तो कोणत्या कारणामुळं पेंडिंग आहे? आणि तिसरं म्हणजे अर्जामध्ये अजून एडिट करायचं असेल तर त्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. सोबत कोणते कागदपत्रं कमी आहेत किंवा अर्ज कोणत्या कारणामुळं रिजेक्ट करण्यात आला आहे, हे देखील सांगण्यात आलं आहे.
आतापर्यंत दाखल झालेले अर्ज किती?
1) दीड कोटींच्यावर ऑनलाईन अर्ज दाखल
2) एक कोटींच्यावर ऑफलाईन अर्ज दाखल
3) सात हजार अर्ज रिजेक्ट
4) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट
5) 17 ऑगस्ट रोजी पहिले 2 हफ्ते खात्यात जमा होणार
हेही वाचा -