ETV Bharat / state

सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime - DEVENDRA FADNAVIS ON CYBER CRIME

Devendra Fadnavis On Cyber Crime : राज्यातील क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस दल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. यासंबंधित मॉडेलचं प्रेझेंटेशन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आलं. मुंबई पोलीस जिमखान्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्व्हल प्रकल्पाचं आज (21 जून) लोकार्पण करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Devendra Fadnavis On Cyber Crime
देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 21, 2024, 4:23 PM IST

मुंबई Devendra Fadnavis On Cyber Crime : राज्यात पोलीस दल अत्याधुनिक करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणार असून त्याचा फायदा हा नक्कीच पोलीस दलाला होणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई पोलीस जिमखान्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मार्व्हल प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराविषयी सांगताना (ETV Bharat Reporter)
कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस दल अत्याधुनिक करण्याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत गेले अनेक महिने एक प्रोजेक्ट आम्ही तयार करत होतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत हा प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक कंपनी आपण सरकारची तयार केलेली आहे, जी पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा कायदा व सुव्यवस्था, आपत्कालीन परिस्थिती तसंच एखादा गुन्हा घडला असेल तर त्या गुन्ह्याची उकल करण्याकरिता करता येणार आहे. या संदर्भात जे काही मॉडेल आपण तयार केलं त्याचं प्रेझेंटेशन हे आज सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत झालं. त्यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्या सूचनांवर लक्ष देऊन आपण लवकरच हा संपूर्ण प्रोजेक्ट प्रत्यक्षात उपयोगात आणणार आहोत.

डेटा ऍनालिसिस होणार काही मिनिटात : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मग त्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं क्षेत्र असेल किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराचं ऍनालिसिस असेल. तसेच आपल्या सीसीटीव्ही कॅमेराचं ऍनालिसिस असेल, तसंच एखाद्या ठिकाणी नंबर प्लेट आयडेंटिफाय करणारा कॅमेरा नसला तरी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण ती नंबर प्लेट आयडेंटिफाय करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे सायबर क्राईम्स आहेत, त्यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात जो डेटा ऍनालिसिस करावा लागतो ज्याला अनेक महिने लागतात. ते काही मिनिटात करण्याची ताकद ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात क्राईमच्या घटना सोडवण्यात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे.

ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी तंत्रज्ञानाचा वापर : ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होणार आहे आणि विशेषत: आपल्याकडे जो डेटा आहे, त्याच्यातल्या वापरण्यात आलेल्या केसेसच्या आधारावर आपल्याला ज्या प्रकारचे मॉडेल्स तयार करावे लागतात, ते मॉडेल तयार करून एकेका युनिटला देणं आणि सगळ्या युनिट्सला इंटिग्रेट करणं अशा प्रकारचं काम हे या माध्यमातून होतय. आपल्याला कल्पना आहे की, देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर डिटेक्शन सेंटर हे म्हापेला लवकर सुरू होत आहे. ज्याची जवळपास सगळी कामं पूर्णत्वाला आलेली आहेत. देशामध्ये सर्वांत आधुनिक अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्या महाराष्ट्राचं असेल आणि कायदा-सुव्यवस्था त्यासोबत ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि गुन्ह्याचं उकलीकरण या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठा फायदा याचा होणार होणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा:

  1. लाइव्ह फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, सुदैवानं जीवितहानी नाही! - international yoga day 2024 live
  2. फक्त योग दिनालाच योग करून चालणार नाही, नियमित योग करा.. रामदास आठवले - International Yoga Day 2024
  3. ''बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवलं तसं शिंदे साहेब...'' बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी - Threat to Bachu Kadu

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.