ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केलं नाही, पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांचा भुजबळांवर निशाणा - Hemant Godse On Election 2024 - HEMANT GODSE ON ELECTION 2024

Hemant Godse On Election 2024 : नाशिक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाला. अशात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपलं काम केलं नाही, असा आरोप करत अप्रत्यक्षरित्या छगन भुजबळ यांच्याकडे निर्देश केला आहे. मात्र, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी, भुजबळ यांनी गोडसे यांचं सर्वाधिक काम केलं, असं म्हणत गोडसे यांच्या आरोपाचं खंडन केलं आहे.

Hemant Godse On Election 2024
हेमंत गोडसे, छगन भुजबळ (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 5:51 PM IST

नाशिक Hemant Godse On Election : नाशिक लोकसभा मतदारसंघाची महायुतीची जागा दिल्लीहून छगन भुजबळ यांना निश्चित झाली होती; मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. गोडसेंबद्दल मित्रपक्ष असलेल्या भाजपा गटात असलेली नाराजी, ऐनवेळी भुजबळांना डावललेली उमेदवारी आणि दहा वर्षांत गोडसे यांच्याकडून शहरात ठोस काम न दिसल्यानं मतदारांनी त्यांना नाकारलं. उध्दव ठाकरे गटाचे उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना निवडून दिलं; मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आपलं काम केलं नसल्यानं आपला पराभव झाल्याचं म्हणत त्यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली.

गोडसे यांची प्रतिक्रिया नैराश्यातून : हेमंत गोडसे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया ही पराभवाने झालेल्या नैराश्येतून आली आहे, असं मत व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत सर्वाधिक काम केलं आहे. छगन भुजबळ हे भर उन्हात गोडसे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत सहभागी झाले होते. या उलट महायुतीचे नेते हे ऐनवेळी हजेरी लावून पुन्हा निघून गेले होते, असं त्यांनी सांगितलं. हेमंत गोडसे यांचं विधान चुकीचं असल्याचं पगार यांनी म्हटलं आहे.

भुजबळांच्या मतदारसंघात महाविकास आघाडी : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना आघाडी मिळाली. त्यामुळे महायुतीत आणखी एक चर्चेला सुरुवात झाली. येवल्यातून भगरे यांना 93 हजार 500 मतं मिळाली तर महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना 80 हजार 295 इतकी मतं मिळाली. अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना 16 हजार 39 इतकी मतं मिळाली. त्यामुळे नाशिक लोकसभेचे पराभूत उमेदवार हेमंत गोडसे यांची भुजबळांविषयी असलेल्या नाराजी का आहे, हे यावरुन दिसून येत आहे.

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची नाराजी : नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव भाजपाच्या दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आलं होतं. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाशिकच्या एका मेळाव्यात जाहीर केलं होतं. त्यामुळे ही जागा हेमंत गोडसे यांना मिळावी यासाठी श्रीकांत शिंदे हे आग्रही होते. त्यामुळे निवडणुकीला काही दिवस उरले असतानासुद्धा महाराष्ट्रातील इतरत्र जागेवर उमेदवार जाहीर केल्यानंतरसुद्धा नाशिकच्या जागेबाबत तेढ कायम होता. अशात मतदानाला काही दिवस उरले असताना भुजबळांनी उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेतली आणि हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भुजबळ समर्थक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा प्रचार करताना दिसून आलं.

हेही वाचा :

  1. जळगाव जिल्ह्यातील तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांचा रशियाच्या नदीत बुडून मृत्यू, एकाला वाचवण्यात यश - Indian Students Drown In Russian River
  2. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024
  3. १० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी - NDA gov formation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.