ETV Bharat / state

हातावरील मेंदीचा रंग ओला असतानाच नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू; वाचवण्याच्या प्रयत्नात भावजीसह मेव्हण्यानंही गमवला जीव - Gadchiroli News - GADCHIROLI NEWS

Grooms Death : लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडलीय. यामुळं नवविवाहिता तसंच त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू
नवरदेवाचा पाण्यात बुडून मृत्यू (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 7:14 PM IST

गडचिरोली Grooms Death : लग्नाच्या चाैथ्या दिवशीच धबधब्याच्या पाण्यात बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा इथं घडलीय. नवनीत राजेंद्र धात्रक (27) रा चंद्रपूर असं नवरदेवाचं तर बादल श्यामराव हेमके (39) रा आरमाेरी असं दुसऱ्या मृतकाचं नाव आहे.

कुटुंबासह गेले होते फिरायला : नवनीत यांचं 7 जून राेजी लग्न झालं. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्या घरी आले. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक हाेते. ते भामरागड इथं राहात हाेते. हेमके आणि धात्रक यांचं कुटुंब बिनागुंडा इथं फिरण्यासाठी गेलं हाेतं. दोन्ही कुटुंबं लग्नामुळं एकत्र आली होती. यावेळी नवनीत हा धबधब्यात आंघाेळ करत असताना खाेल पाण्यात गेला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात बादल हेसुद्धा पाण्यात उरतले. मात्र दाेघांनाही पाेहता येत नसल्यानं दाेघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची माहिती लाहेरी पाेलीस मदत केंद्राला देण्यात आली. यानंतर दाेघांचेही मृतदेह भामरागडमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

मेंंदी जाण्यापूर्वीच पतीचा मृत्यू : लग्नाला नेमके चारच दिवस झाले हाेते. नवनीत आणि त्यांची पत्नी दाेघंही फिरण्यासाठी बिनागुंडा इथं आले हाेते. दाेघांनीही सुखी संसाराचं स्वप्न बघितलं हाेतं. मात्र, हे स्वप्न अधुरंच राहिलं. अवघ्या चार दिवसांतच नवनीतनं जगाचा निराेप घेतला. त्यामुळं नवविवाहिता तसंच त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

काही वर्षांपूर्वी पूर्वी एका डॉक्टरनं याच धबधब्याखाली गमावला जीव : बिनागुंडा येथील धबधबा दिसायला अतिशय लहान आहे. मात्र या धबधब्यात उन्हाळ्यातही जवळपास 15 ते 20 फूट वरुन पाणी खाली पडत असतं. धबधब्याची खोली लक्षात येत नाही. त्यामुळं धबधब्यात बुडून मृत्यू होतात. काही वर्षांपूर्वी भामरागड तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या नागालँड येथील एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता. भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी लोखंडी खांब उभारावेत जेणेकरुन नागरिक खोल पाण्यात जाणार नाही, तसंच उतरण्यासाठी पायऱ्यांच्या आणि फोटोग्राफी पाँइंटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

  1. कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये बहुतांश भारतीय असण्याची भीती - Kuwait Building Fire
  2. मलावीचे उपराष्ट्रपती सॉलोस चिलिमा यांच्यासह 9 जणाचा विमान अपघातात मृत्यू - Saulos Chilima dies in plane crash
  3. पत्नी पत्नीच्या भांडणात पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी; निर्दयी बापानं पोटच्या मुलीला आपटलं जमिनीवर - Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.