ETV Bharat / state

गोविंददेव गिरी महाराजांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार केला -देवेंद्र फडणवीस - Govinddev Giri Maharaj In Alandi

स्वामी श्री. गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचं कार्य सातत्यानं केलं आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी श्री. गोविंददेव गिरी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. आळंदी येथे आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवात ते बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 2:04 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली. ज्या भूमीतून हे कार्य झालं त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत, असं नमूद करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिलं आहे. स्वामी श्री गोविंददेव गिरि महाराज यांनी 81 देशांत लाखो लोकांपर्यंत भगवद्गीता पेाहोचवण्याचं कार्य केलं आहे.

मधूर वाणीने आध्यात्म विचाराच्या प्रसाराचं कार्य केलं : संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवलं. त्या माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणाऱ्या विद्वानाचा सत्कार होणं हा चांगला योग आहे. स्वामी श्री गोविंददेव गिरी यांनी राष्ट्राची आणि सृष्टीची चिंता केल्यानं त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे, असं श्री फडणवीस म्हणाले. स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांनी आपल्या मधूर वाणीने आध्यात्म विचाराच्या प्रसाराचे कार्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या आहेत.

व्रतस्थ वृत्तीने त्यांचं कार्य आजही सुरू : स्वामी श्री गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, गीता परिवार, महर्षी वेद व्यसास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत श्री. ज्ञानेश्वर गुरूकुलाच्या माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्षे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, वेदवाङ्मयाबाबत देशविदेशात प्रबोधनाचे काम केलं आहे. व्रतस्थ वृत्तीने त्यांचं कार्य आजही सुरू आहे. आध्यात्मिक मूल्यांचं पालन, संवर्धन करताना त्यांनी आध्यात्म विचार सर्वदूर पोहोचवला आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

1 छत्रपती शिवाजी महाराजांमुळे औरंगजेब त्रास भोगून मेला, आता कोणीही विचारत नाही - योगी आदित्यनाथ

2 संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुंडांबरोबरचा आणखी एक फोटो पोस्ट; म्हणाले 'पैचान कौन?'

3 गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेनं का चुकवावी - सुप्रिया सुळे यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.