ETV Bharat / state

मोक्काच्या गुंडाकडून चौघांना अमानुष मारहाण; वराहाला मारल्याच्या राग, सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल - Youth Beaten By Goons - YOUTH BEATEN BY GOONS

Youth Beaten By Goons : वराहाला मारल्यानं मोक्कातील आरोपीनं चौघांना अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. या पीडितांना कुख्यात गुंडानं लोखंडी पाईपानं मारहाण केली.

Youth Beaten By Goons
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 1:16 PM IST

कोल्हापूर Youth Beaten By Goons : इचलकरंजीतील शहापूर इथं वराहाला मारल्याच्या कारणावरुन मोक्काच्या गुंडानं चार जणांना लोखंडी पाईपनं अमानुष मारहाण करण्यात आली. या चौघांना पाईपनं मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाणीची माहिती पोलिसांना दिल्यास घरात येऊन गोळ्या घालीन अशी धमकी यावेली गुंडांनी दिली असून महिन्याला मला पैसे द्यावे लागतील, अशी खंडणी मागितल्याचा आरोप पीडितांनी केला. या प्रकरणी शाम लाखे, त्याचे वडील, आदर्श ऊर्फ आद्या, माया, सुरज आणि इतर दोन अनोळखी (रा. दत्तनगर शहापूर) यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली.

वराह अंगावर धावून आल्यानं मारहाण : रविवारी रात्री नऊच्या सुमारास पीडित त्याच्या मित्रांसह चालत येताना शहापूर इथल्या वर्धमान चौक गल्लीतील वराह त्यांच्या अंगावर चावण्यासाठी धावून आले. त्यामुळे त्यांनी त्याच्या दिशेनं दगड मारले असता, त्यातील एका वराहाचा मृत्यू झाला. तिथं असलेल्या मोक्कातील गुंडांनं पीडितांसह त्याच्या साथीदारांना मारहाण केली. यावेळी गुंडानं गाडीवर जबरदस्तीनं बसवून श्याम लाखे याच्या दत्तनगर शहापूर इथल्या घरी नेलं. शिवीगाळ करीत पीडिताचे हात आणि पाय धरुन शाम लाखे यानं लोखंडी पाईप घेऊन शिवीगाळ करीत वराहाला का मारलंस, मी कोण आहे माहीत नाही का, असं म्हणत लोखंडी पाईपनं मारहाण केली. पुन्हा वर्धमान चौकात दिसायचं नाही, जर दिसला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तसेच या प्रकाराबाबत पोलीस केस केली, तर तुमच्या घरात येऊन गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितांनी केला. आता मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, असं म्हणून पीडिताजवळचे 3 हजार रुपये देण्यास भाग पाडलं, असा आरोपही पीडितानं पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

पोलिसांना मिळाला मारहाणीचा व्हिडिओ : "इचलकरंजीतील शहापूर जवळील दत्तनगरच्या गल्ली नंबर चारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून चौघांना पाईपनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबतचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे. तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्यांचा शोध घेत आहे," अशी माहिती शङापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

हेही वाचा :

  1. बाबू भगरे यांची धास्ती; शिक्षक निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे नामसाधर्म्य असलेले किशोर दराडे यांना मारहाण - Kishor Darade Beaten
  2. इन्स्टाग्रामवर 'गे' म्हणल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण, मोडले नाकाचे हाड - BEATING FRIEND ON INSTAGRAM comment
  3. वाहन चोरीच्या संशयावरुन 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत खून; आरोपीला पोलिसांकडून अटक - Mumbai Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.