ठाणे Ganesh Chaturthi 2024 : लोकमान्य टिळकांनी स्वतः स्थापन केलेले ठाण्यातील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजेच चरईतील 'लोकमान्य आळीतील गणपती'. लोकमान्य टीळकांची ठाणे कारागृहातून सुटल्यानंतर टिळकांनी यांनी याठिकाणी येऊन भाषण केलं होतं. या गणपती मंडळाची 1920 साली स्थापना करण्यात आली होती. यावर्षी या गणेशोत्सव मंडळाने 105 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
फक्त दीड फुटांची गणेश मूर्ती : लोकमान्य टिळकांना अपेक्षित असं कोणत्याही प्रकारे डीजे किंवा आरडाओरडा न करता दरवर्षी गणेशोत्सव येथे साजरा केला जातो. फक्त दीड फुटांची मूर्ती या गणेशोत्सव मंडळाची असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष मयुरेश देव यांनी दिली.
येथे होते लोकमान्य टिळक आरती : लोकमान्य आळीतील गणेशाची स्थापना झाल्यापासून या ठिकाणी लोकमान्य टिळक यांची आरती देखील म्हटली जाते. सकाळ आणि संध्याकाळ या आरतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महाराष्ट्रभरातून अनेक भाविक या आरतीसाठी उपस्थित राहतात.
दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी : आजपासून भाविकांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानं देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईत आज सकाळपासून लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 6 वाजल्यापासून मोठ्या जल्लोषात भाविकांना दर्शन रांग खुली करण्यात आली होती. यावेळी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं.
हेही वाचा -
- लाइव्ह लाडके बाप्पा विराजमान! 'अँटिलिया'मध्ये गणरायाचं आगमन; अंबानी कुटुंबानं केली पूजा; पाहा व्हिडिओ - Ganeshotsav 2024 Live Update
- लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024
- नितीन गडकरींच्या निवासस्थानी एक नाही तर दोन बाप्पा झाले विराजमान... - Ganeshotsav 2024