पिंपरी चिंचवड Pune Firing : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर पुन्हा पुण्यात गोळीबार झाला आहे. पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीनं एका व्यक्तीवर गोळी झाडली असून त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केलीय.
आकाश जाधव'वर रुग्णालायत उपचार : या घटनेनं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत 'आकाश जाधव'वर गोळी झाडण्यात आली असून त्याच्यावर रुग्णालायत उपचार सुरू आहेत. तसंच अनिल सखाराम ढमाले (वय 52, रा. बालेवाडी) असं गोळी झाडून आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलजवळील दुर्गा कॅफेजवळ ही घडना घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकादा राज्यात कायदा सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ढमालेनं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या : मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथे राहणाऱ्या आकाश जाधव या तरुणावर त्याच्याच परिचित असलेल्या अनिल ढमालेनं सायंकाळी गोळीबार केला आहे. अनिल ढमाले यानं आकाश जाधवला त्याच्यासोबत कॉफी पिण्यासाठी हॉटेलमध्ये नेलं होतं. त्यानंतर ढमालेनं आकाशवर गोळीबार केलाय. त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केलीय. त्यामुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
आर्थिक वादातून गोळीबार केल्याची शक्यता : याबाबतची माहिती अशी की, गेल्या 14 वर्षांपासून बाणेर येथील हाय स्ट्रीटवरील आकाशची सोन्याची दुकान अनिल ढमाले चालवत होता. धमालेनं व्यावसायासाठी आकाशकडून पैसे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळं आकाश अनिलकडं पैसे मागत असल्यानं गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरू होता. या त्रासामुळंच त्यानं हल्ला केला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हे वाचलंत का :