मुंबई Govinda join Shiv Sena : हिंदी चित्रपटसृष्टीत 'चिची' नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता दिसत आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात गोविंदा यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच अभिनेता गोविंदा लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण काही दिवसापूर्वी अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
गोविंदा यांची राजकीय कारकीर्द : अभिनेता गोविंदा यांनी 2004 मध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे राम नाईक यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या तिकिटावर गोविंदा यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यावेळी भरघोस मतांनी ते जिंकून आले होते. मात्र, त्यावेळी गोविंदा हे यशाच्या शिखरावर होते. तरुणांमध्येसह सिने रसिकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ होती. त्याचाच फायदा काँग्रेसला घेता आला. मात्र, सध्या गोविंदा फारसे चर्चेत नाहीत. त्यामुळं त्यांना उमेदवारी दिल्यास आता किती लाभ होईल, हे सांगता येणार नाही.
शिंदे गटात करणार लवकरच प्रवेश : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अमोल कीर्तिकर यांच्या नावावर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून जवळपास शिकामोर्तब झालं आहे. त्यामुळं आता गजानन कीर्तिकरांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी लोकांना आवडेल असा उमेदवार देण्याची गरज आहे. यासाठी गोविंदा यांच्या नावाला पसंती दिली जात आहे. त्यासाठी गोविंदा लवकरच शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की याबाबत केवळ प्राथमिक स्तरावर, माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र ,अद्याप कोणतीही निश्चिती झालेली नाही. त्यामुळं गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केल्यास ते निवडून येणार का? हे येणारा काळचं ठरवेल.
हे वाचलंत का :
- निवडणुकीचं काम नको रे बाबा! 'इलेक्शन ड्यूटी' रद्द करण्यासाठी विविध कारणं घेऊन कर्मचारी निवडणूक विभागात - Lok Sabha Elections 2024
- बारामतीनंतर आता रावेरमध्येही खडसे विरुद्ध खडसे? नणंद-भावजयीत लढतीची शक्यता - Raver Lok Sabha Constituency
- अरविंद केजरीवाल यांना अटक: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'कर्माची फळं भोगतायत' - Anna Hazare News