ETV Bharat / state

ईव्हीएम मशीननं उठवलं रान; 'ईव्हीएम' खरंच हॅक होतं का? जाणून घ्या... - EVM Machine Hacking - EVM MACHINE HACKING

EVM Machine Hacking : मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लागलेल्या निकालात रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाले तर प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला. यानंतर ईव्हीएम हॅकिंगचा संशय व्यक्त होत आहे. राहुल गांधी यांनीही ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अशी पोस्ट केली. तर राज्यात शिंदे आणि ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरून वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. याबाबत सायबर तज्ञांचं काय मत आहे हे जाणून घेऊ....

EVM Machine Hacking
फाईल फोटो (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 5:59 PM IST

Updated : Jun 17, 2024, 6:19 PM IST

मुंबई EVM Machine Hacking : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला; मात्र मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील लागलेला निकाल आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धत यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. निवडणूक आयोगाने रवींद्र वायकर यांना अवघ्या 48 मतांनी विजयी घोषित केले. यामुळे पराभूत झालेले अमोल कीर्तीकर यांनी आणि त्यांच्या पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय शंकास्पद आहे. त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. तर आता दुसरीकडे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, याच्यावरूनही कालपासून चर्चा रंगत आहेत.

ईव्हीएम हॅकिंगबाबत प्रश्नच : एक्सचे सर्वेसर्वा अरे अँलेन मस्क यांनी ईव्हीएम हॅकबाबत पोस्ट केली. यानंतर राहुल गांधी यांनीही ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते, अशी पोस्ट केली. तर राज्यात शिंदे आणि ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरून वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. यातच रविवारी निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत वाढली असून, हे प्रकरण शंकास्पद असल्याचं बोललं जात आहे. ईव्हीएम मशीनला मोबाईल कनेक्ट केला जाऊ शकतो का? किंवा मोबाईलमुळे ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, नेमकं काय आहे प्रकरण पाहूया

नेमकं काय आहे प्रकरण? : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. सुरुवातीला कीर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आलं; मात्र कीर्तीकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर यात वायकर यांना 48 मतांनी पराभूत घोषित करण्यात आलं. यानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जाताहेत. दुपारपर्यंत रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यात आकडेवारीवरून चुरशीचा सामना रंगला होता. साडेतीन वाजेपर्यंत 26 फेऱ्या झाल्या होत्या आणि अमोल कीर्तीकर हे आघाडीवर होते. केवळ तीन फेऱ्या बाकी होत्या; मात्र निकाल जाहीर करण्यास रात्री आठ का वाजले? या साडेचार तासात निवडणूक निर्णय अधिकारी यांना कोणाचा फोन गेला? त्यांच्यावर राजकीय दबाव होता का? रवींद्र वायकरांचे नातेवाईक आतमध्ये फोन घेऊन कसा काय गेले? असे अनेक आरोप ठाकरे गटाकडून गेले जाताहेत. तसेच निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी सीसीटीव्ही फूटेज देण्यास का नकार करत आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून कोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला असून, निकाल हा शंकास्पद आहे का? असा संशय आता मतदारांच्या मनात देखील येत आहे.

दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये रवींद्र वायकर यांना जरी खासदार म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले असले तरी, ते अजून अधिकृत खासदार नाहीत आणि ते शपथ घेऊ शकत नाही असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते. मशीन हॅककरूनच रवींद्र वायकर यांना विजयी करण्यात आलं आहे. रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल कसे काय घेऊन गेले? त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निर्णय शंकास्पद आहे. यात घोटाळा झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दुसरीकडे या आरोपनंतर निवडणूक आयोगालाही खुलासा करण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद घ्यावी लागली.

तिथे ईव्हीएम खराब नव्हती का? : निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मोबाईल हा ईव्हीएम मशीनला कनेक्ट होऊ शकत नाही किंवा ओटीपीद्वारे मतांची फेरफार केली जाऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं आहे. आता आमचा खासदार निवडून आला आहे. बाकीच्या ठिकाणी त्यांचे खासदार निवडून आलेत तिथे ईव्हीएम खराब नव्हती का? फक्त उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातच ईव्हीएम मशीन खराब झाले का? यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हे रडीचा डाव खेळत आहेत, असे शिवसेना (शिंदे गट) आणि खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते का?: दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर ईव्हीएम मशीन हॅक बाबत चर्चा होऊ लागली. यानंतर, दोन दिवसापासून भारतात देखील ईव्हीएम मशीन भारतात केव्हापासून आली? केव्हापासून ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्यात आले? यावर चर्चा रंगत असताना ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते का? किंवा मशीनला मोबाईल कनेक्ट केला जाऊ शकता का? असं सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांना विचारले असता, भारतात ईव्हीएम मशीनला मोबाईल कनेक्ट केला जाऊ शकत नाही किंवा मोबाईल कनेक्ट करून ओटीपीच्या आधारे मतदानात फेरफार केली जाऊ शकत नाही. मात्र परदेशात ईव्हीएम मशीनला मोबाईल कनेक्ट होऊ शकतो. भारतात मोबाईल कनेक्ट केला जाऊ शकत नाही, असं सायबर तज्ञ अंकुर पुराणिक यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएम हॅक करता येत नाही : हा पॉलिटिकल पार्ट आहे : सध्या ईव्हीएम मशीनवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. ईव्हीएम मशीन हॅकिंगचा देशभर मुद्दा गाजत आहे, त्यामुळे मशीन हॅक होण्याचा प्रश्नच येत नाही. ईव्हीएम मशीन हॅक होत नाही. पण अशी कुठलीही टेक्नॉलॉजी हॅक करता येऊ शकते. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करता येत नाही. कारण ईव्हीएम मशीनमध्ये असे काही पार्ट बसवले आहेत. असे काही नाविन्यपूर्ण तंत्र त्याच्यात आहे, ज्यामुळे तुम्ही मोबाईल काय कोणत्याही सहाय्याने ईव्हीएम मशीन हॅक करू शकत नाही, असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सायबर तज्ञ प्रशांत माळी यांनी म्हटलं आहे. तसंच सध्या ईव्हीएम हॅकिंग विरोधात जे बोलत आहेत, तो पॉलिटिकल पार्ट आहे. पॉलिटिकल अजेंडा आहे. मोबाईल कनेक्ट करून किंवा ओटीपीच्या माध्यमातून मतमोजणीत फेरफार करता येत नाही आणि मशीन तर अजिबात हॅक करता येत नाही, असंही सायबर तज्ञ प्रशांत माळी यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाची कोर्टात धाव : अंकुर पुराणिक पुढे म्हणाले की, मशीनवर जी उमेदवारांची अनुक्रमणिका असते ती मतदानाच्या आदल्या दिवशी काही तास अगोदर समजते. ही माहिती देखील गुप्त ठेवली जाते. ही माहिती मतदानाच्या आधी फक्त निवडणूक आयोग यांनाच माहित असते. त्यामुळे कुठला उमेदवार कितव्या क्रमांकावर आहे, याची माहिती बाहेर जर येत नसेल तर ईव्हीएम मशीन हॅक कसे काय केले जाऊ शकते? मात्र ईव्हीएम मशीनवरून पुन्हा एकदा देशात राजकीय पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप होत असून, ठाकरे गटाकडून कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्ट काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. "रवींद्र वायकरांच्या निकालात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा मोठा हात''; संजय राऊतांचा खळबळजनक दावा - Mumbai North West election
  2. "नवनीत राणा निवडून आल्या असत्या तर..."; आमदार रवी राणांनी बच्चू कडूंना सुनावलं - Ravi Rana On Navneet Rana
  3. ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल - EVM Hacking Case

Last Updated : Jun 17, 2024, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.