ETV Bharat / state

निवडणूक संपली तरीही राजकीय नेत्यांची एकमेकांविरोधातील खालच्या पातळीची भाषा थांबेना.... - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांमधील चिखलफेक अन् प्रचाराचा खालावलेला दर्जा, खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप यांना मात्र अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

Low level language of leaders
नेत्यांची खालच्या पातळीची भाषा (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2024, 5:54 PM IST

मुंबई- महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. सुसंस्कृत राजकारण करणारे राज्य म्हणून त्याची आतापर्यंत ओळख आहे, मात्र या ओळखीला तडा जाऊ देणारी परिस्थिती हळूहळू निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येतंय. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला, मतदान झाले आणि निकालदेखील लागलाय. मात्र, प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांमधील चिखलफेक अन् प्रचाराचा खालावलेला दर्जा, खालच्या पातळीवर जाऊन केलेले आरोप-प्रत्यारोप यांना मात्र अद्यापही ब्रेक लागलेला नाही. उलट राज्यात निकालानंतर या आरोप-प्रत्यारोपांना खालच्या पातळीवरील वक्तव्यांना अधिकच धार आल्याचे चित्र दिसून येतंय.

मविआच्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर : विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागलाय. त्यावरून अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात येतंय. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडीमधील मतपत्रिकेवरील मतदानाच्या आग्रहामुळे हा वाद आणखी चिघळलाय. यातूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेली वक्तव्य चर्चेत आलीत.

महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य : 50 ते 60 वर्षांत शरद पवारांची पहिल्यांदाच राजकीय हत्या झालीय, अशी टीका भाजपाचे आमदार सदाभाऊ खोतांनी केलीय. देवाभाऊ वस्ताद आहेत, तर बारामतीचा पैलवान हा पैलवान नव्हे दुधी भोपळा आहे. शरद पवारांना एवढं हाणलंय तरी म्हणतंय मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, चेहरा काय तुमच्या चेहऱ्यासारखा बदलायचाय, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडले होते. तर 100 शकुनी मेले तेव्हा पवार जन्माला आले, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. महाराष्ट्र हे देशातील पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. सुसंस्कृत राजकारण करणारे राज्य म्हणून त्याची आतापर्यंत ओळख आहे, मात्र या ओळखीला तडा जाऊ देणारी परिस्थिती हळूहळू निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येतंय. एकीकडे भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा सन्मान केला जाणार आहे, बदला घेणारे राजकारण केले जाणार नाही, अशी संयत भूमिका विधानसभेतदेखील घेतलीय. असे असताना त्यांच्याच पक्षाचे वाचाळवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पडळकर आणि खोत या आमदारांनी पवारांवर केलेल्या अश्लाघ्य टीकेवर आश्चर्य व्यक्त केले जातंय.

पवारांवर टीका करून स्वत:चं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न : विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतरही भाजपाच्या या नेत्यांना अस्तित्व दाखवण्यासाठी शरद पवारांवर टीका करावी लागतेय, शरद पवारांवर टीका करून स्वत:चे पक्षांतर्गत महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका राजकीय वर्तुळातून केली जातेय.

पडळकर अन् खोत यांना काळे फासण्याचा इशारा : शरद पवार यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि जातीय तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा मुंबई प्रदेशचे युवकचे अध्यक्ष ॲड. अमोल मातेलेंनी केलीय. राज्यातील शांतता आणि सामाजिक सौहार्द राखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पडळकर आणि खोत यांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचा इशारा त्यांनी दिलाय.

हेही वाचा -

  1. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतच जुंपली; दिल्लीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार?
  2. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये तफावत? निवडणूक आयोगानं दिलं थेट स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.