ETV Bharat / state

लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, अन्यथा...' - Prithviraj Chavan - PRITHVIRAJ CHAVAN

Prithviraj Chavan : लोकसभा सभापती निवडीच्या संदर्भाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठ वक्तव्य केलंय. सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून लोकसभेचा सभापती ठरवला नाही तर इंडिया आघाडी उमेदवार उभा करेल, असं विधान त्यांनी केलंय.

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 17, 2024, 10:48 PM IST

सातारा Prithviraj Chavan : लोकसभा सभापतिपदाचा चेहरा निश्चित करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली तर त्याला पाठिंबा दिला जाईल. आपल्याकडं लोकशाहीत ती परंपरा चालत आली आहे. मात्र, रेटून काही केलं तर आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी माध्यमांशी बोलताना केलंय.

एनजीओंचा वापर लोकशाही वाचवण्यासाठीच : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या 'लोकनेते विलासराव पाटील प्रवेशद्वार' कमानीच्या उ‌द्घाटनानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. नरेटीव्ह सेट करण्यासाठी एनजीओंचा वापर केल्याच्या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही एनजीओंचा वापर लोकशाही वाचवण्यासाठी केला. त्यांचे आम्ही आभार मानतो. सत्ताधाऱ्यांना त्यात अर्बन नक्षलवादी घुसल्याचं वाटत असेल तर सरकारनं त्याची चौकशी करावी.

उत्तर पश्चिमच्या निकालात गडबड : राहुल गांधींचा विजय झाला. त्यावर अविश्वास का दाखवत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ईव्हीएम खराब आहे, असा आम्ही आरोप केलेला नाही. पण, उत्तर पश्चिम मुंबईत काहीतरी घडल्याशिवाय गुन्हा दाखल केला आहे का? त्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी आम्हाला का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

जरांगेंना काय आश्वासन दिलंय ते जाहीर करावं : कुणबी नोंदी रद्द करण्यासह कुणबींना ओबीसीत घेण्याचा जीआर काढू नये, यासाठी ओबसीसी नेत्यांनी उपोषण सुरू केलंय. तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचा ठराव त्यांनी केला आहे. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मनोज जरांगे यांचे उपोषण सोडताना नक्की काय आश्वासन दिलं होतं ते अगोदर मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं. कारण मराठा समाजाची फसवणूक केल्याचा काय परिणाम झालाय, ते आपण पाहत आहोत.

हेही वाचा -

  1. इंडिया आघाडीचं सरकार आल्यास निवडणूक आयोगाच्या सदस्य निवड प्रक्रिया बदलणार - पृथ्वीराज चव्हाण - India Alliance
  2. पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व...; पृथ्वीराज चव्हाण यांना उमेश पाटलांचा सल्ला - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'साताऱ्याची निवडणूक...' - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.