ETV Bharat / state

राज कुंद्राच्या घरावर ईडीची छापेमारी, पॉर्नोग्राफी प्रकरणात छापेमारी करण्यात आल्याची माहिती - RAJ KUNDRA

पॉर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. आता याच प्रकरणात पुन्हा छापेमारी करण्यात आल्याचे म्हटले जातंय.

ED raids Raj Kundra house
राज कुंद्राच्या घरावर ईडीची छापेमारी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 11:52 AM IST

Updated : Nov 29, 2024, 8:59 PM IST

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ED ने राज कुंद्राच्या घरावर आणि कार्यालयासह त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकलेत. पोर्नोग्राफीप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती समोर आलीय. ईडीने राज कुंद्राच्या घरावर, कार्यालयासह अन्य ठिकाणी हे छापे टाकलेत. पॉर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे. आता याच प्रकरणात पुन्हा छापेमारी करण्यात आल्याचं म्हटलं जातंय.

संशयित म्हणून राज कुंद्रा यांची चौकशी : मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने या प्रकरणी एकूण मुंबई आणि उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे टाकलेत. मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि इतर माध्यमांना अश्लील व्हिडीओ पुरवण्यात संशयित म्हणून राज कुंद्रा यांची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं जातंय.

राज कुंद्राला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती : राज कुंद्रा याला गुन्हे शाखेने जुलै 2021 मध्ये अटक केली होती. पॉर्नोग्राफी प्रकरणात शहर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राज कुंद्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं होतं. या प्रकरणी त्याला दोन महिने तुरुंगवासही भोगावा लागला होता.

Last Updated : Nov 29, 2024, 8:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.