मुंबई Praful Patel Money Laundering Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर आता प्रफुल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयानं मोठा दिलासा दिला. ईडीनं पीएमएलए ( PMLA ) कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊस येथील त्यांच्या मालकीच्या 12 व्या आणि 15 व्या मजल्यावरील फ्लॅटची जप्ती रद्द केली. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत 180 कोटी रुपये आहे.
प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा : मनी लॉड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वरळीच्या सीजे हाऊसमधील मालमत्ता जप्तीची कारवाई ईडीकडून रद्द करण्यात आली. 2022 मध्ये ईडीनं ही मालमत्ता जप्त केली. PMLA केसबाबत साफेमा ट्रिब्यूनलकडं प्रफुल पटेल यांनी या जप्ती कारवाई विरोधात दाद मागितली होती.
गुन्हेगाराच्या आईकडून घेतलेल्या मालमत्तेत मनी लाँड्रिंग : फरार अर्थिक गुन्हेगार असिफ आणि जुनेद यांची आई हजरा मेमनकडून प्रफुल पटेल यांनी ही मालमत्ता खरेदी करताना मनी लॉड्रिंग केल्याचा ठपका ईडीनं ठेवला. ईडीनं 2022 मध्ये प्रफुल्ल पटेल, त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट जप्त केले. त्यांच्यावर गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या पत्नीकडून बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होता.
इक्बाल मिर्चीशी करार करुन मालमत्ता खरेदीचा आरोप : ईडीनं कारवाई केलेल्या मालमत्तेतील दोन मजले इक्बाल मिर्ची याच्या कुटुंबाचे होते, असा आरोप करण्यात आला. ही मालमत्ता आधीच ईडीनं जप्त केली होती. ही मालमत्ता व्यावसायिक वापरात होती. इक्बाल मिर्चीसोबत करार करुन ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता. ईडीच्या दाव्यानुसार हा करार 2007 मध्ये झाला होता. अर्थात प्रफुल पटेल यांनी हा आरोप फेटाळून लावला. ईडी पीएमएलए कायद्यांतर्गत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत होती. या प्रकरणी ईडीनं आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर 2019 मध्ये प्रफुल पटेल यांची चौकशी करण्यात आली.
हेही वाचा :