ETV Bharat / state

आमदार रोहित पवारांना ईडीचा झटका; कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, पवार म्हणाले, "भाजपात जायचं का?"

MLA Rohit Pawar : ईडीकडून रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आलाय. बारामती अ‍ॅग्रो प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू होती.

MLA Rohit Pawar
आमदार रोहित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 6:16 PM IST

Updated : Mar 8, 2024, 9:53 PM IST

कारखाना जप्तीविषयी सांगताना विकास लवांडे

पुणे MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना ईडीनं झटका दिलाय. शुक्रवारी (8 मार्च) ईडीकडून रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरू होती. ईडीकडून आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आलीय. याबाबत ईडीकडून ट्विट देखील करण्यात आलंय.

काय म्हणाले रोहित पवार? : ईडीकडून जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यावर रोहित पवार यांनी ट्विट करत उत्तर दिलंय. "माझ्या कंपनीवर ED नं केलेल्या कारवाईचं ट्विट वाचलं आणि विचार आला आता भाजपामध्ये जायला पाहिजे का? पण भाजपानं लक्षात ठेवावं की झुकणारे आणि रडणारे गेले आता फक्त लढणारे शिल्लक आहेत आणि आम्ही अखेरपर्यंत लढू आणि जिंकू. माझ्यासारख्या स्वाभिमानी मराठी माणसाला गुडघ्यावर आणण्याची स्वप्न बघणाऱ्यांनी केवळ स्वप्नच बघावीत. या कारवाईवरुन आचारसंहिता येत्या दोन-तीन दिवसांतच लागेल, हेही दिसतंय," अशी तिखट प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

महादेव तिसरा डोळा उघडेल : "ही कारवाई पूर्णतः बेकायदा असून, याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. पण प्रश्न इतकाच आहे की, अशी कारवाई केवळ माझ्याविरोधातच का? पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना आज तरी असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही! वाढदिवसाच्या दिवशीही अशाच एका एजन्सीनं कारवाई केली आणि आता महाशिवरात्रीच्या दिवशी दुसरी कारवाई. परंतु मी महादेवाचा भक्त आहे. अन्यायाविरोधात जनता जनार्दनरुपी महादेव तिसरा डोळा उघडेल, तेंव्हा अनेकांचं थयथयाट झाल्याशिवाय राहणार नाही," असंही आमदार रोहित पवार म्हणाले.

ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी आक्रमक : ईडीकडून रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "महाराष्ट्र दिल्लीपुढं झुकणार नाही. देशभरात विरोधकांच्या खच्चीकरणासाठी ही मोहीम राबवली जात आहे. ही केवळ राजकीय सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे."

हेही वाचा :

  1. महाशिवरात्री 2024 : साई बाबांच्या प्रसादालयात 15 हजार किलो साबुदाणा खिचडीचा प्रसाद
  2. सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन
  3. तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आदेशानुसार वकील म्हणून नियुक्ती, किशोर भालेरावांना न्यायालयाचा दिलासा

Last Updated : Mar 8, 2024, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.