ETV Bharat / state

गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिरात विराजमान होणार 'दगडूशेठ'चे पार्वतीनंदन - Dagadusheth Ganesha Installed

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 7:32 PM IST

Dagadusheth Ganesha Installed: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टतर्फे १३२ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. आशियातील सर्वांत उंच शिवमंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जातं.

Dagadusheth Ganesha Installed
दगडूशेठ गणपती मंदिर (ETV Bharat Reporter)

पुणे Dagadusheth Ganesha Installed : उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार आहे. हे भाविकांकरिता विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

दगडूशेठ गणपती मंदिराच्या प्रतिकृतीची पूजा करताना भाविक (ETV Bharat Reporter)

'या' पदाधिकाऱ्यांची उपस्थिती : सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक अमन विधाते व दिपाली विधाते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी आहे सभामंडपातील खांबांची रचना : गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब तसेच ५० फूट रूंद आणि १११ फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम तर विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मंडपवाले यांनी केली आहे.

असे आहे मंदिराचे वैशिष्ट्य : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्यावतीने जी यंदाची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. ते हिमाचल प्रदेशच्या सोलनमधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. जटोली मंदिर विशिष्ट अशा दक्षिण-द्रविड वास्तुशैलीमध्ये बांधले गेले असून ते सलग तीन पिरॅमिडने बनलेले आहे. पहिल्या पिरॅमिडवर गणेशाची प्रतिमा तर दुसऱ्या पिरॅमिडवर शेष नागाची प्रतिमा दिसते.

हेही वाचा :

  1. रामोजी राव अनंतात विलीन; चंद्राबाबू नायडू यांनी दिला खांदा, भविष्यातील पिढींसाठी मिळणार प्रेरणा - Ramoji Rao Last Rites At Smruthi Vanam
  2. मंत्रिपदासाठी आम्ही वाट पाहायला तयार, कॅबिनेट पद पाहिजे होतं पण....; अजित पवारांची प्रतिक्रिया - Ministerial Allotment
  3. भीषण पाणीटंचाईच्या गावात मुबलक पाणी, जाणून घ्या, हस्ता गावानं कसा केला कायापालट? - CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Water issue

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.