ETV Bharat / state

डीआरआयची मोठी कारवाई; शरीरात लपवून आणल्या कोकेनच्या 'इतक्या' कॅप्सूल, व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला ठोकल्या बेड्या - डीआरआयची मोठी कारवाई

DRI Seize Cocaine : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 6 कोटींपेक्षा जास्त किमतीचं कोकेन जप्त केलंय.

DRI Seize Cocaine
DRI Seize Cocaine
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 8:02 AM IST

मुंबई DRI Seize Cocaine : महसूल गुप्तचर संचलनालयानं (डीआरआय) अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात 6 कोटी पेक्षा जास्त किमतींचं कोकेन जप्त केलंय. हे अमली पदार्थ कॅप्सूलमधून लपवून मुंबईत आणल्याची माहिती डीआरआयचे अधिकारी प्रविण जिंदल यांनी दिलीय.

शरीरातून आणलं कोकेन : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 16 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं ड्रग्ज बाळगल्याचा संशय असलेल्या एका व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला अटक केली. या प्रवाशाकडं चौकशी केली असता, त्यानं भारतात तस्करी करण्यासाठी ड्रग्ज असलेल्या कॅप्सूलचं सेवन केल्याचं आणि ते शरीरात लपवल्याचं कबूल केलं. अटक केलेल्या प्रवाशाला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

शरीरातून 57 कॅप्सूल जप्त : या प्रवाशाच्या शरीरातून 628 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 57 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेनची किंमत 6 कोटी 2 लाख इतकी आहे. हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि या प्रवाशाला NDPS कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आलीय. नंतर न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आलीय. भारतात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीमध्ये गुंतलेल्या या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाकडून पुढील तपास सुरू आहे.

गेल्या काही दिवसात अनेक कारवाया : महसूल गुप्तचर संचलनालय (डीआरआय) नं गेल्या काही दिवसात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. तस्करांकडून परदेशातून अनेक वेळा विविध पद्धतीनं अमली पदार्थ आणले जातात.

हेही वाचा :

  1. मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक
  2. मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी, विदेशी महिलेकडून 13 कोटीचं कोकेन पकडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.