ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरणात डॉक्टर श्रीहरी हाळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घटकांबळे यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Pune Hit And Run Case Update - PUNE HIT AND RUN CASE UPDATE

Pune Hit And Run Case Update : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांची आज (30 मे) पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना 05 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Pune Hit And Run Case Update
आरोपींना पोलीस कोठडी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:04 PM IST

पुणे Pune Hit And Run Case Update : कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या अहवालात फेरफार केल्या प्रकरणावर आज झालेल्या सुनावणीत तपास अधिकारी म्हणाले की, आरोपींना सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. आता या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कलम समाविष्ट करण्यात आलं आहे. संपूर्ण तपास एसीपी दर्जाचे अधिकारी करणार आहे. डॉ. श्रीहरी हाळनोर याने अल्पवयीन मुलाचे रक्त घेतले होते. ज्या सिरिंजमध्ये घेतले ती सिरिंज कचरापेटीत न टाकता कुणालातरी दिल्या. कुणाला दिले त्याचा शोध घ्यायचा आहे. रक्त नमुन्यावरील सील जप्त करायचे आहे. त्याने एका महिलेचे रक्त घेतले होते. ते कुणाचे आहे? यांनी कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला? यांचे एकमेकांशी कॉल झाले त्याचा तपास करायचा आहे. तसेच आणखी काही जण संशयित आहेत, त्यांचा देखील तपास करायचा आहे. आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, असं सांगण्यात आलं. तसेच मुलाचे रक्त सीसीटीव्ही असलेल्या ठिकाणी घेतले आणि त्या महिलेचे रक्त सीएमओच्या खोलीत घेतले की, जिथं सीसीटिव्ही नाही.

आरोपीच्या पोलीस कोठडीविषयी माहिती देताना बचाव पक्षाचे वकील (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले आरोपी डॉक्टरांचे वकील? : यावेळी सरकारी वकील म्हणाले की, ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये आणखी काही जणांच्या हालचाली दिसत आहेत. यांच्या घराची झडती घेतली आहे. या गुन्ह्यात मुलाच्या वडिलांचा सहभाग दिसून येतो. त्याबाबत तपास करायचा आहे. म्हणून पोलीस कोठडी देण्यात यावी असं सांगण्यात आलं. यावेळी आरोपीचे वकील युक्तिवादात म्हणाले की, आज सांगितलेली कारणे पहिल्या दिवशी सांगितलेल्या कारणांचीच प्रतिमा आहे. डॉ. तावरे यांचा घटनास्थळी कुठेच प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. फक्त नवीन कलम लावले म्हणून कोठडी देऊ नये. परस्परांत कॉलिंग झाले म्हणून कोठडी मागण्याचे कारण नाही. मालमत्तेची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. मुलाचे वडील यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळं समोरासमोर बसवून तपासाची गरज नाही. तर यावेळी डॉ. हळनोरचे वकील म्हणाले की, कोठडीची कारणे दिली ती नवीन नाहीत. कलम वाढली म्हणून फक्त नवीन स्वरूपात दिली. आरोपींकडून 2.50 लाख हस्तगत केले आहे. आणखी काही हस्तगत करायचे नाही. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही.

हेही वाचा :

  1. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद, राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात लढाई - Legislative Council Elections
  2. छोटा राजनला विशेष न्यायालयानं सुनावली जन्मठेप; 'या' प्रकरणात सुनावण्यात आली दुसऱ्यांदा जन्मठेप - Jaya shetti murder case
  3. अमरावती लोकसभेचा कधी लागणार निकाल? मतमोजणी केंद्र सज्ज - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.