ETV Bharat / state

'तुम्ही केले ते संस्कार अन् आम्ही केली ती गद्दारी'; 'जाणता राजा'वर ही वेळ का आली, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "शरद पवार यांनी दिल्लीत गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणत्या नेत्याच्या घरी बैठक घेऊन भाजपासोबत जायचं, याबाबतची तयारी केली होती. या बैठकीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडं आहेत," असा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांच्या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

Lok Sabha Election 2024
मंत्री धनंजय मुंडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 10:45 AM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : "बारामती लोकसभेत अजित पवार यांनी गद्दारी केली, असं म्हटलं जाते. मात्र तुम्ही केले ते संस्कार आणि आम्ही केली ती गद्दारी," असा जोरदार हल्लाबोल मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला. "खरं बोललं तर शरद पवारांविरोधात बोलला असंही म्हणलं जाते, पण शरद पवार आमच्यासाठी आजही दैवत आहेत. आदर आहे, जाणता राजा आहेत, पण जाणता राजाचं कुटुंब हे जनता असते. परंतु आज जाणता राजाला जनतेतून कुटुंब निवडावं लागते ही वेळ का आली, याचा विचार करा," अशी जोरदार टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केली.

आपल्याकडं व्हिडिओ, फोटो पुरावे : मी आज जाहीरपणे अगदी जबाबदारीनं सांगतो की, "2014 ला तुम्ही केलं ते संस्कार, 2017 ला केले तारखेसहित चतुर्थीच्या दिवशी दिल्लीत कुणाच्या घरी, किती वाजता कशी बैठक झाली हे सांगतो. व्हिडिओ सहित पाहिजे असेल तर मी कुणालाही आव्हान देतो, उत्तर द्यायला मी तयार आहे. नेमकं 2017 ला काय झालं, 2019 ला काय झालं हे सगळं मी जाहीरपणे सांगण्यास धाडस करतोय, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्ही केलं ते संस्कार, आम्ही केली ते गद्दारी असं होत नाही, असा जोरदार हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर केला.

सुनेत्रा वहिनी सून म्हणून आल्यानंतरच बारामतीचा विकास : "बारामतीची निवडणूक ही मराठवाड्यातील दुष्काळी भागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील लेकीच्या प्रतिष्ठेची आणि तुमच्या सुनेला निवडून आणून देण्याची आहे. एका कुटुंबाचं भवितव्य घडवण्याची आहे. 1978 ला शरद पवार मुख्यमंत्री झाले, परंतु 1985 ला अजित पवार यांचा विवाह झाला आणि सुनेत्रा वहिनी सून म्हणून बारामतीला आल्या. त्यानंतरच खऱ्या अर्थानं बारामतीचा विकास झाला," असं सुद्धा यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

पुढच्या पंचवीस वर्षात महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही : देशात आयपीएल चालू असून निवडणुकाही चालू आहेत. एकीकडं आयपीएलमध्ये अकरा खेळाडू असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अकरा खेळाडू घेऊन बॅटिंग करत आहेत. तर दुसरीकडं इंडिया 11 त्रिक 33 खेळाडू खेळवून लढत आहे. परंतु पुढच्या पंचवीस वर्षात सुद्धा त्यांना जिंकता येणार नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

बारामतीचा विकास करण्यासाठी मतदान करा : "ही निवडणूक भाऊबंदकीची नसून या भागाचा विकास करण्यासाठी सकाळी पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत काम करणाऱ्या अजित पवारांच्या नेतृत्वाला बळकट करण्यासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून बारामती विकसित करण्यासाठी ही निवडणूक आहे. त्यामुळे घड्याळाचे बटन दाबून अजित पवार यांचे हात बळकट करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा," असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. पुण्यातील सासवड येथे गुरुवारी धनंजय मुंडे यांची सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. त्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "महायुतीचा पराभव करणं कुणालाही शक्य नाही. अख्खा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं उभा असणार आहे. बारामती सुद्धा त्यांच्या विजयाचा वाटेकरी असेल," असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. बुलढाण्यात मतदानाला सुरुवात; अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांनी केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  2. लोकसभा निवडणूक 2024 मतदान ; विवाह होण्यापूर्वी अमरावतीत वरानं केलं मतदान - Lok Sabha Election 2024
  3. "मानसपुत्रानं साताऱ्यात चार नव्हे 40 सभा घेतल्या तरी,..."; उदयनराजेंचं थेट शरद पवारांना आव्हान - Udayanraje Bhosale

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.