ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर व्हीलचेअरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एअर इंडियाला तीस लाखांचा दंड - एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

DGCA fines Air India : मुंबई विमानतळावर व्हीलचेअरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना 16 फेब्रुवारी घडली होती. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (Directorate General of Civil Aviation) एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावला आहे.

DGCA fines Air India
DGCA fines Air India
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 5:44 PM IST

मुंबई DGCA fines Air India : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्हीलचेअरअभावी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर एअर इंडियाला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 16 फेब्रुवारी रोजी एका प्रवाशानं त्याच्या पत्नीसह न्यूयॉर्कहून मुंबईला येण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाची सीट बुक केले होती. त्यानंतर प्रवाशानं न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास केला. मात्र, मुंबई विमानतळावर वृद्ध प्रवाशाला व्हीलचेअर मिळू शकली नाही. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. या विमानात एकूण 32 प्रवाशांना व्हीलचेअरची आवश्यकता होती. परंतु एअर इंडिया विमानात फक्त 15 व्हीलचेअर उपलब्ध होत्या. त्यामुळं या घटनेची गंभीर दखल घेत DGCA नं (Directorate General of Civil Aviation) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

व्हीलचेअरच्या मागणीमुळं, प्रवाशांला व्हीलचेअर सहाय्यक उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी पत्नीला व्हीलचेअरवर बसवत पायी चालत इमिग्रेशनपर्यंत येण्याचा निर्णय घेतला होता.- एअर इंडिया

हृदयविकाराच्या झटक्यानं प्रवाशाचा मृत्यू : विमानतळावर प्रवाशी उतरल्यानंतर त्यांना व्हीलचेअर हवी होती. मात्र, प्रवाशाला एकच व्हीलचेअर मिळाली. त्यामुळं प्रवाशानं आपल्या पत्नीला व्हीलचेअरवर बसवलं. त्यानंतर प्रवाशी पायी चालत इमिग्रेशन परिसरात पोहोचला. त्याचवेळी प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानं प्रवाशाचा खाली कोसळून मृत्यू झाला. मनुभाई पटेल असं या प्रवाशाचं नाव असून ते अनिवासी भारतीय आहेत.

सहार पोलीसात मृत्यूची नोंद : या प्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नियमांनुसार आवश्यक व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एअरलाइनची आहे. मात्र, या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका आता एअर इंडियावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळं विमान कंपनीला 30 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.

हे वाचलंत का :

  1. जे आर डी टाटा यांची पुण्यतिथी; देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिली नवी भरारी
  2. Israel On Attack : इस्रायल-हमासच्या युद्धामुळं एअर इंडियानं घेतला 'हा' मोठा निर्णय
  3. Air India Urination Case : मुंबई -दिल्ली विमानात प्रवाशाने किळसवाण्याचा प्रकाराची हद्दच ओलांडली..विमातळावर झाली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.