ETV Bharat / state

उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - DEVENDRA FADNAVIS ट - DEVENDRA FADNAVIS ट

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दादर येथील वसंत स्मृती भवन कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला विधानसभा, विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 8:04 PM IST

Updated : Jun 8, 2024, 10:21 PM IST

मुंबई Devendra Fadnavis : महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात आज भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा जोमानं मैदानात उतरून जास्तीत जास्त जागा निवडणून आण्यासाठी त्यांनी मर्गदर्शन केलं.

'मी' नैराशेतून वक्तव्य केलं नाही : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी पुन्हा मोदींसह एनडीए सरकारवर विश्वास दाखवलाय. पण त्यांच्या विजयात आपणाला सिंहाचा वाटा उचलता आला नाही. महाराष्ट्रात अपेक्षित यश आले नाही, त्याची कारणे शोधून पुन्हा एकदा विधानसभेत विजय कसा मिळेल या दिशेनं पावलं उचलायली हवी. त्यामुळं पुन्हा एकदा नव्यानं राजकीय पेरणी करण्याची गरज आहे. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकतीनं अंगावर घ्यायचं असत, ते पचवायचं असत. महाराष्ट्रात ही जबाबदारी मी घेतली. पॉलिटिकल अर्थ गणितात आपण कमी पडलो आहोत. मला सरकारमधून मोकळं करा, असं मी नैराशेतून वक्तव्य केलं नाही. मी पळणारा व्यक्ती नाही. माझ्या डोक्यात काही प्लान होते, आजही आहेत. मी अमित शाह यांना भेटलो. जे सांगायचं ते सांगितलं. त्यांनी सांगितलं पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होऊ द्या, नंतर ब्ल्यूप्रिंट तयार करू.

चौथा पक्ष होता नकारात्मक विचार : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी शांत बसणारा व्यक्ती नाही. मी आता एक मिनिटसुद्धा शांत राहणार नाही. काही लोक नरेटिव्ह पसरवतात. भाजपाला सर्वात जास्त जागा भेटल्या आहेत. 43.9 टक्के मतं महाविकास आघाडीला, 43.6 टक्के महायुतीला भेटली आहे. पण, त्यांच्याकडं 31 खासदार आहेत, तर आपल्याकडं 17 खासदार आहेत. म्हणजे फक्त .03 टक्के मते आपल्याला कमी मिळालीय. आपण तीन नाही, तर चार पक्षाशी लढत होतो. चौथा पक्ष होता नकारात्मक विचार. संविधान बदलणार हा विषय इतक्या मोठ्या प्रमाणात पेरला गेला, त्याला आपण थांबऊ शकलो नाही. दलित, आदिवासी समाजात ही नकारात्मकता मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आली. पण अशी नकारात्मकता फक्त एका निवडणुकीपर्यंत चालते. मराठा समाजाला दोन्ही वेळी आपणच आरक्षण दिलं. आपण मराठा समाजाला बरंच काही दिलं. पण जे मराठा समाज विरोधात होते, त्यांनाच मोठ्या प्रमाणात मते मिळाली.

ठाकरेंना हद्दपार केलं : फडवणीस पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळवले, असा आरोप झाला. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्र मागे होता, तो आपण एक नंबरवर आणला. उद्योग पळाले असते, तर गुजरातच्या दूपट महाराष्ट्रमध्ये गुंतवणूक कशी आली असती. उद्धव ठाकरे यांना सहानुभूती कुठे आहे? ठाणे, कल्याण, पालघर, कोकण येथे त्यांचे उमेदवार पडले. मुंबईत मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. तर एका विशिष्ठ समाजाची मत त्यांनी मिळवली. मुंबई, कोकण येथे ठाकरेंना लोकांनी हद्दपार केलं. एक, दोन टक्के मतांनी आपण जागा हरलो आहोत. भाजपाच्या 11 जागा 5 टक्क्यांपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. त्यांना 31 जागा मिळाल्या, तर ते विधानसभेत दिसून यायला हवं होते. महाविकास आघाडीला 130 जागांवर आघाडी तसंच आपणाला 75 जागांवर आघाडी मिळाली आहे. आपल्या फक्त 9 जागा निवडून आल्या आहेत.

उणे-धुणे काढण्याची वेळ नाही : माझी एकच विनंती आहे. कधी कधी पराजय होतो. पण पराजय झाल्यावर एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडू नका. इथे आम्हाला समन्वयाचा अभाव दिसला. आपल्या मित्र पक्षांची मदत आपणाला झाली आहे. आपली मदत त्यांना झाली आहे. आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्र पक्षांचं काम केलं. काल मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आहे. प्रवकत्यांनी बोलतात समजून बोललं पाहिजे. मी नितेश राणे यांना ही सांगितलं आहे. ही उणे धुणे काढण्याची वेळ नाही. आता वेग वेगळी विश्लेषण करू नका. आता एका सुरात सर्वांनी बोलायला पाहिजे, असं मी मुख्यमंत्री, अजित पवार यांनाही सांगितलं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती की, विधानसभेत आपल्याला 3 ते3.5 टक्के मते कमी मिळाली आहेत. ती आपण सहज पार मिळवू शकतो. आपण सर्व आपल्या मित्र पक्षांना घेऊन मैदानात उतरू. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल, मी तुमचा आभारी आहे. पूर्ण ताकतीनं जोपर्यंत या महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा फडकावत नाही, तो पर्यंत मी थांबणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. मुख्यमंत्रीपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षातील नेते आग्रही - Shrikant Shinde should get cabinet
  2. शिंदे गटाच्या नेत्यांची बालीश बडबड; शिवसेनेच्या 'त्या' दाव्यावरुन ठाकरे गटाची टीका - Shivsena MPs
  3. कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party

Last Updated : Jun 8, 2024, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.