ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय यात्रांचं पेव - Maharashtra Assembly Elections - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS

Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं राज्यात यात्रांचं पेव फुटलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी संपर्क यात्रेला सुरवात केली असून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी चांगलाच रंगणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी कंबर कसली असून यात्रांना सुरवात केलीय.

Leader of Mahayuti and Maha Vikas Aghadi
महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आ (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 10:46 PM IST

मुंबई Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजपा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच राजकीय पक्षांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम दोन महिन्याचा कालावधी उरलेला असताना राजकीय पक्ष आपली भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेच्या मनातील मतांची चाचपणीसुद्धा करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका या निवडणुकीत बसू नये, याकरता महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी विशेष लक्ष दिलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रचार विधानसभा निवडणुकीत बदलला जाणार आहे. या राजकीय पक्षांच्या यात्रांच गूढ? आहे, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आता शरद पवारांची शिव स्वराज्य यात्रा : सप्टेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता असून त्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेला जनतेचा कौल विधानसभा निवडणुकीसाठी स्फूर्तीदायक ठरणार आहे. आतापर्यंत शिवछत्रपतींच्या नावावर प्रचाराचा हक्क बजावणारी शिवसेना तसंच भाजपा यांना सोडून यंदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात 'शिव स्वराज्य' यात्रेला सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेली शिव स्वराज्य यात्रा संपूर्ण राज्य पिंजून काढणार आहे. सरकारच्या विविध योजना कशा फसव्या आहेत, हे जनतेला समजावून सांगण्याचं काम या यात्रेतून केलं जात आहे. आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी हे सरकार लाडक्या बहिणीसारख्या योजना आणत आहेत. ज्या बहिणी त्यांना लोकसभेला आठवल्या नाही, त्या आता विधानसभेला आठवणार आहेत. लोकसभेला झालेल्या दारुण पराभव हेच त्याच्या मागचं गमक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. एकंदरीत शिव स्वराज्य यात्रेद्वारे राज्यात सरकारकडून होणारी जनतेची दिशाभूल यावर जास्त प्रमाणात फोकस करणार आहे. दुसरीकडं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातून दौऱ्याला सुरुवात केलीय.

अजित पवारांसाठी तारेवरची कसरत : महायुतीत नव्यानं समाविष्ट झालेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यंदा दुहेरी भूमिकेत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रावादी काँग्रेसचा फारसा फायदा महायुतीला झाला नाही. त्या कारणानं अजित पवार यांनी विशेष रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राज्यात जनसन्मान यात्रा सुरू केलीय. या यात्रेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीतून झाला असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ असा जनसन्मान यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही जनसन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाणार आहे. या यात्रेत समाजातील सर्व घटकांशी थेट संवाद साधला जाणार असून ही यात्रा योजनांपुरती मर्यादीत न राहता समाजातील सर्व समाज घटकांना काय अपेक्षित आहे? त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना मोठा फटका सहन करावा लागलाय. त्या अनुषंगानं भावनिक मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित केलं जात आहे.

काँग्रेसच्या न्याय यात्रेला सुरुवात : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास विधानसभेसाठी दुणावला आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सुरुवातीला मुंबईतून न्याय यात्रा काढण्याचं ठरवलं असून शनिवार १० ऑगस्टपासून त्याची सुरुवात झाली आहे. सतत १६ दिवस मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ही ‘न्याय यात्रा’ फिरणार आहे. तसंच या न्याय यात्रेमध्ये महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड केला जाणार असून जागोजागी कोपरा सभा सुद्धा घेण्यात येणार आहेत. न्याय यात्रेचं नेतृत्व हे खासदार वर्षा गायकवाड करीत आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, "मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात न्याय यात्रेदरम्यान सभा घेऊन जनतेच्या मूलभूत समस्यांकडं लक्ष वेधलं जाणार आहे. गेली दोन वर्षे मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचं काम राज्यातलं महायुती सरकार करत आहे. त्यासंदर्भात मुंबईकरांना सविस्तर माहिती देण्यावर यात्रेचा मुख्य भर असणार आहे".

मुंबईतून फुंकलं जाणार निवडणुकीचं रणशिंग : विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं महाविकास आघाडीची पहिली सभा ही मुंबईमध्ये १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग याच सभेतून महाविकास आघाडी फुंकणार, अशी शक्यता आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे येथील बीकेसीमध्ये एक सभा पार पडणार आहे.

भाजपासाठी संवाद यात्रा महत्त्वाची : भाजपा राज्यात जनतेबरोबर संवाद यात्रेद्वारे संपर्क साधणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपा पुन्हा संवाद यात्रेद्वारे जनतेशी संपर्क साधणार आहे. फेक नेरेटिव्हचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीनं मोठ्या प्रमाणात गाजवला. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या पराभवाचा वचपा करण्यासाठी भाजपा सज्ज झाला आहे. आता पुन्हा जोमानं विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना संवाद यात्रा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 18 ते 18 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. शाह हे ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात राज्यातील सर्व सहा विभागांचा दौरा करणार असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा घेणार आहेत. सहा विभागातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असून मुख्यता विदर्भ, मराठवाड्यावरती जास्त फोकस करणार आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी भाजपाचा दारुण पराभव झाला होता. महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला असून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असून भाजपाच्या संभावित उमेदवारांची यादी तयार केली जाण्याची शक्यता आहे.

प्रचारादरम्यान प्रत्येक पक्षाचा कस लागणार : राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यावर बोलताना म्हणाले, "निवडणुकीच्या पूर्वी अशा पद्धतीच्या यात्रा काढणं, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणं, हे काही नवीन नाही. यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीच्या यात्रा काढण्यात आल्या आहेत. २०१९ पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जनाधार यात्रेद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. आपापल्या पक्षाचं ब्रँडिंग जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रा काढल्या जातात. विशेष म्हणजे शिव स्वराज्य यात्रा शरद पवारांच्या पक्षानं काढली आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या नावानं यापूर्वी शिवसेना,भाजपाच यात्रा काढत होते. सरकारच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सरकारचं काम आहे. तर, सरकारी योजनेतील त्रुटी जनतेसमोर उघड करणं, हे विरोधकांचं काम आहे. दुसरीकडं आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून या मुद्द्यावर जनतेपर्यंत कशा पद्धतीनं राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतात यावरही बरचंकाही अवलंबून असेल. लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे आता विधानसभा निवडणुकीतील चालणार नाहीत. त्यामुळं वेगळे मुद्दे घऊन प्रत्येक पक्षाला जनतेच्या दरबारात जावं लागणार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांचा राडा; गाडीवर फेकल्या बांगड्या आणि शेण - Thackeray Group VS MNS
  2. "मुंबईत येऊन...", मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा - Manoj Jarange Patil
  3. "निकालाच्या दिवशी महाविकास आघाडी फुटणार", आशिष शेलार यांचा दावा - Ashish Shelar On Mahavikas Aghadi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.