ETV Bharat / state

रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातील निर्णयाबाबत निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा - DGP RASHMI SHUKLA

केंद्रिय निवडणूक आयुक्तांनी आज पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं.

रश्मी शुक्ला
रश्मी शुक्ला (File image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2024, 5:16 PM IST

Updated : Oct 15, 2024, 5:58 PM IST

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसनं केली होती,त्यावर निवडणूक आयुक्तांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी पोलीस महासंचालकांची निवडणूक ही युपीएससीच्या माध्यमातून होत असते. त्याशिवाय प्रकाश सिंग यांच्या खटल्यामध्ये यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं त्यावेळी काही निर्देश दिले होते. कोर्टानंच काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशांच्या अनुषंगानं जे काही निवडणूक आयोगाला करावं लागेल ते आयोग करेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.

महाराष्ट्र मोठा असूनही राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. दुसरीकडे झारखंड छोटं राज्य असूनही तिथे दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुकीची मागणी केली होती. तर विरोधकांनी जास्त टप्प्यांची मागणी केली होती. सत्ताधाऱ्यांना झुकतं माप नाही का, असा प्रश्न विचारला असता, निवडणूक आयुक्त म्हणाले की, झारखंडमध्ये गेल्यावेळी ५ टप्प्यात मतदान झालं होतं. आता ते फक्त २ टप्प्यात होत आहे. झारखंडमध्ये काही मुद्दे आहेत, ज्यामुळे तिथे दोन टप्प्यात मतदान घ्यावं लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होईल तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात.

एक्झिट पोलच्या संदर्भात विचारणा केली असता सर्वच माध्यमे तसंच प्रामुख्यानं इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असून राजीव कुमार यांनी एकप्रकारे उदाहरणासह माध्यमांचे थेट कान टोचले. एक्जिट पोलच्या माध्यमातून दोन दिवस आधी जे चित्र लोकांच्यासमोर उभं केलं जातं ते किती वास्तवदर्शी आहे याचं आत्मपरीक्षण प्रत्येक माध्यमकर्मीनं केलं पाहिजे. मतमोजणीच्या दिवशी तर सकाळी आठ वाजता कामकाज सुरू होत असली तरी सर्व तयारी करुन प्रत्यक्ष मतमोजणीला साडेआठ वाजता सुरूवात होते. मात्र अशी अनेक उदाहरणं आहेत की आठ वाजून पाच मिनिटांनीच चॅनेलवर आघाडी आणि पिछाडीची आकडेवारी दाखवली जाते. हे किती हास्यास्पद आहे. याचा विचार माध्यमांनी केला पाहिजे.

यावेळी नांदेडची आणि वायनाडची लोकसभा पोटनिवडणूकही याच तारखेला होणार आहे का असं विचारलं असता राजीव शुक्ला यांनी याच दिवशी म्हणजे २० तारखेला मतदान होईल असं स्पष्ट केलं.

Last Updated : Oct 15, 2024, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.