ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरण : कोणालाही पाठिशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. यावरुन आज विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नसल्याचं सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरण : कोणालाही पाठिशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
मुख्यमंत्र्यांची बनावट सही प्रकरण : कोणालाही पाठिशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 12:11 PM IST

मुंबई DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदनं समोर आली असून, राज्य शासनानं या प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेतली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही : याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. यावर स्पष्टिकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदनं सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याची मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आढळून आली. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारनं त्याची दखल घेतली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलाय. या प्रकरणामागे कोण आहे, याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही."

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : मुख्यमंत्री कार्यालयात कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्के असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयाच्या निदर्शनास आलं होतं. यासंदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन (ई ऑफिस प्रणाली) संबंधित प्रशासकीय विभागांना पत्र पाठवण्यात येतात. नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद तसंच बनावट असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर हा सर्व प्रकर उघडकीस आला.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्र्यांची निवेदनांवर खोटी स्वाक्षरी, मुख्यमंत्री सचिवालयाच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.