ETV Bharat / state

सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा; सात पिढ्यांसाठी कुटुंब समाजातून बहिष्कृत - Love Marriage Punishment Beed - LOVE MARRIAGE PUNISHMENT BEED

Love Marriage Punishment Beed : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यानं त्यांना जात पंचायतीनं अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्यामुळे कुटुंबातील सुनेसह मुलाला जात पंचायतीमध्ये बोलावण्यात आले. त्यांनीही दंड भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला.

Love Marriage Punishment Beed
आष्टी पाेलीस ठाणे (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 2:34 PM IST

Updated : Sep 27, 2024, 4:53 PM IST

बीड Love Marriage Punishment Beed : राज्यात प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांबरोबर आपण अनेक चांगल्या आणि वाईट घटना घडलेल्या बातम्या वाचल्या असतील. मात्र आता एका प्रेमविवाहाच्या प्रकरणात घडलेल्या प्रकारानंतर तुम्हालाही जात पंचायतीचा राग आल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही असणाऱ्या या देशांमध्ये जातपंचायत बोलावणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो. परंतु हा गुन्हा आजही काही लोक सर्रास करत असल्याचा प्रकार बीडच्या आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलाय..

पंचांकडून कुटुंबाला सात पिढ्यांसाठी बहिष्कृत करण्याचा आदेश : सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केल्यानं त्यांना जात पंचायतीनं अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्यामुळे कुटुंबातील सुनेसह मुलाला जात पंचायतीमध्ये बोलावण्यात आले. त्यांनीही दंड भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसेच पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू, अशा धमक्याही दिल्या. खरं तर हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडलाय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असता अखेर 9 जणांविरोधात आष्टी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा जात पंचायतीच्या अतिरेकाचा मुद्दा समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

माहिती देताना आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (ETV Bharat Reporter)

नरसू फुलमाळी यांना 2 लााख 50 हजारांचा दंड: मालन शिवाजी फुलमाळी (32 रा. कडा कारखाना ता. आष्टी) असं जात पंचायतीमुळे पीडित झालेल्या सुनेचे नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला होता. यांची जात ही नंदीवाले (तीरमाली) अशी असल्याने जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना 2 लााख 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. परंतु अनेक वर्ष उलटल्यानंतरही त्यांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे 21 सप्टेंबर 2024 रोजी शिवाजी पालवे (रा. धमगरवाडी ता.नेवासा जि. अहमदनगर) यांच्यामार्फत जात पंचायतीमध्ये मालन यांना बोलावण्यात आले. ही पंचायत आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे होती. त्याप्रमाणे त्या पती शिवाजी, मुलांसह तेथे पोहोचल्या. या ठिकाणी पंचांसह समाजाचे 800 ते 900 लोक आगोदरच जमलेले होते. त्यादिवशी निर्णय झाला नाही. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी पुन्हा जात पंचायत बोलावण्यात आली. सकाळी 11 पंचांसमारे त्यांना उभे करण्यात आले. सासऱ्याने दंड भरला नाही म्हणून तुम्ही भरा, असे सांगितले. तुम्हीही दंड भरला नाही तर समाजातून तुम्हालाही बहिष्कृत करू, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू, अशा धमक्या दिल्या. शेवटी दंड भरू न शकल्याने पंचांनी मालन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला 7 पिढ्यांसाठी समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला.

9 जणांविरोधात गुन्हा दाखल: त्यामुळे मालन यांनी आष्टी पाेलीस ठाणे गाठत तक्रार केली. त्यावरून आष्टी पोलीस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुलमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी यांच्यासह इतर पंचांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण 4, 5, 6 तसेच बीएनएस 189 (2), 351 (2) (3), 352 अशा कलमांन्वये 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचाः

  1. इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 वर्षानंतर आरोपीला अटक - Minor Girl Sexual Abuse
  2. धारावीत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक - Minor girl raped

Last Updated : Sep 27, 2024, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.