मुंबई Financial Fraud Mumbai : फिल्म प्रोड्युसर असलेल्या राकेश साकट (वय 52) हे गेल्या वीस वर्षांपासून अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला सर्कल परिसरात राहतात. त्यांनी मोबाईलवर आलेला ओटीपी शेअर न करूनही त्यांच्या बँक खात्यातून 4 लाख 50 हजार 300 रुपये डेबिट झाले. याप्रकरणी प्रोड्युसर राकेश साकट यांनी अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरोधात भारतीय दंड संविधान कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांनी दिली आहे.
साडेचार लाखाचे ट्रांझेक्शन : फिल्म प्रोड्यूसर राकेश साकट यांना 11 मे रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास जिम वरून राहत्या घरी गेल्यानंतर अचानक मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आला होता. मात्र तक्रारदार यांनी तो ओटीपी कोणालाही शेअर केलेला नाही. तरीसुद्धा प्रोडूसर साकट यांच्या बँक खात्यातून तीन ट्रांजेक्शन होऊन 4 लाख 50 हजार 300 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे चक्रावून गेलेल्या फिल्म प्रोडूसर यांनी ब्रांच मॅनेजरला कॉल करून झालेल्या ट्रांजेक्शन बाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला; परंतु ब्रांच मॅनेजरने कॉल रिसीव केला नाही.
ना कॉल ना ओटीपी, तरीही पैसे कटले : तक्रारदार फिल्म प्रोड्यूसर राकेश साकट यांना कोणाचाही कॉल आला नव्हता किंवा त्यांनी कोणालाही ओटीपी शेअर केला नव्हता. तरीदेखील तक्रारदार यांच्या बचत खात्यातून साडेचार लाख रुपये डेबिट झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी 1930 या महाराष्ट्र सायबर सेलच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून ऑनलाइन ट्रांजेक्शन केलेल्या अज्ञात इसमा विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेऊन अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune
- "पराभव झाल्यानं रडीचा डाव": रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, मुख्यमंत्री म्हणाले.... - MP Ravindra Waikar on EVM Hacking
- "ईव्हीएम अन् मोबाईलचा संबंध..."; ईव्हीएम हॅकिंगवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Ravindra Waikar VS Amol Kirtikar