नवी मुंबई Customs Department Action : उरण परिसरातील जेएनपीटी मधील न्हावा शेवा पोर्ट मधील 40 फुटांच्या कंटेनरमध्ये चीनमधून फटाके अवैधरित्या आयत केल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने कंटेनर अडवला. त्यासंदर्भात विचारणा केली. तेव्हा कंटेनरमधील कर्मचाऱ्यांनी यामध्ये लादी पुसण्यासाठी वापरण्यात येणारे मोब्स असल्याचे सांगितले. मात्र कंटेनरची तपासणी केली असता त्यात विनापरवाना फटाके आणण्यात आल्याचे दिसून आले. सीमाशुल्क कायद्यानुसार अवैधरित्या फटाक्यांच्या आयातीवर बंदी असल्यामुळे हे फटाके सीमा शुल्क विभागाच्या माध्यमातून जप्त करण्यात आले.
'डीजीएफटी'कडून आयात परवाना घेणे गरजेचे: 'डीजीएफटी'कडून परदेशातून फटाके आयात करण्यासाठी परवण्याची गरज असते. मात्र हे परवाने मिळवण्याची प्रक्रिया किचकट आणि कठीण असते. त्यामुळे ही प्रक्रिया टाळून 'जेएनपीटी' बंदरात कोणताही परवाना न मिळवता अवैधरित्या चायनीज फटाके आयात करण्यात आले. जप्त केलेले फटाके पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझमच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई : विदेशी सामानांची चोरटी आयात रोखण्यासाठी सीमाशुल्क विभाग नेहमी तत्पर असते. याचाच अनुभव मुंबई विमानतळावर 23 मे, 2023 रोजी आला होता. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 6 परदेशी नागरिकांना अटक केली होती. सीमाशुल्क विभागाने या नागरिकांकडून सुमारे 1. 98 कोटी रुपये किमतीच्या 3.7 किलोग्राम सोन्याची पावडर जप्त केली होती. एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रवाशांनी शरीरात सोने लपवून ठेवले होते.
अशा प्रकारे सापडले सोने : कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या प्रोफाइलिंगच्या आधारे त्यांच्या शरीरात काही वस्तू असल्याचे समजले. त्यांच्या तपासणीत त्यांनी त्यांच्या शरीरात सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले होते. हे सर्व सहा प्रवासी एकाच सोन्याच्या तस्करी करणाऱ्या कार्टेलमधून जोडलेले आहेत का, त्यांना हे सोने कोणी सुपूर्द केले आणि ही खेप कोणाला मिळणार होती, याचा कस्टम आता तपास करत आहे. या प्रकरणी बोलताना एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये आम्ही, असे निरीक्षण केले आहे की, प्रवासी तस्करीत गुंतण्यासाठी वाहक म्हणून काम करतात. त्यांना तस्करांकडून एकतर मोफत परदेशी सहली किंवा पैसे देण्याचे आश्वासन दिले जाते.
हेही वाचा: