ETV Bharat / state

नरेंद्र मोदी सरकारकडून सत्तेचा गैरवापर, हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी तर मंडपासाठी १२ कोटी खर्च केल्याचा पटोलेंचा दावा - Nana Patole

मोदी सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईतील विधानभवन परिसरात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.

Nana Patole
नाना पटोले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 7:21 PM IST

नाना पटोले यांची पत्रकार परिषद

मुंबई : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. काल महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्थसंकल्पासह केंद्रातील मोदी सरकारवर निशाना साधला आहे. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळी राज्य सरकार झोपलं होतं का, असा हल्लाबोल त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

जनतेला महागाईच्या आगीत लोटण्याचा प्रयत्न : सरकारनं राज्याची तिजोरी कशी लुटली, हे कालच्या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे. राज्यावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. तसंच 1 लाख कोटींची तूट राज्यावर आहे. जनतेला महागाईच्या आगीत लोटण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे. जनतेच्या खिशातून टॅक्स वसूल केला जात आहे. राज्यात 60 टक्के अनावश्यक खर्च वाढवला असून राज्यात कर्ज काढून दिवाळी साजरी करायचा प्रकार सुरू झाला आहे. जनतेच्या घामाच्या पैशाची लूट करून हे सरकार देश तसंच राज्य चालवत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केला आहे.

आंदोलन सुरू असताना सरकार झोपलं होतं का : देशातील मालमत्ता विकल्या जात आहेत. राज्यात लूटमार सुरू आहे. देशात, राज्यात लोकशाही व्यवस्था राहिलेली नाही. लोक या सरकारला विरोध करत आहेत. अधिवेशनावर अनेक मोर्चे निघत आहेत. त्यात जुनी पेन्शन योजना, आंगणवाडी सेविकांचे प्रश्न, धनगर आरक्षणाच्या आंदोलकांना पोलिसांकडून धमकावलं जात आहे. आंदोलक, मोर्चेकऱ्यांवर सरकारकडून एसआयटी लावली जात आहे. सत्तेचा सर्रास दुरुपयोग होताना दिसतोय. ठेकेदारांकडून पैसे घेऊन घर भरलं जात आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येत आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना सरकार झोपलं होतं का? असा सवाल पटोले यांनी राज्य सरकारला केला आहेत. तसंच या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केलीय.

हेलिपॅडसाठी साडेतीन कोटी खर्च : राज्याला लुटणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहात आहे. ऊर्जा विभागाकडून शेतकऱ्यांना मदत केली जात नाही. कांदा उत्पादकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर दिसत नाही. आज यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होत असून, मोठा बंदोबस्त केला जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावलं आहे. 12 कोटींचा मंडप उभारण्यात आला आहे. हेलिपॅड बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च झाले आहेत. जनतेचा पैसा खर्च करण्याऐवजी भाजपानं प्रचारासाठी पक्षाचे पैसे खर्च करावेत. यवतमाळमध्ये बोलताना 2014 मध्ये देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन, असं मोदी म्हणाले होते. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली होती. मोदी सरकार महिलांना खोटी हमी देऊन पैशांची उधळपट्टी करत असल्याची टीका नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केलीय.

हेही वाचा -

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली होती, त्याप्रमाणं... - एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

'माझ्या माहितीप्रमाणे अमित शाह यांना पंतप्रधान व्हायचं आहे'; संजय राऊत यांचा मोठा दावा

लोकसभेच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांचं मोठ वक्तव्य; म्हणाले,...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.