ETV Bharat / state

समोशामध्ये बटाट्याऐवजी आढळलं कंडोम; पुण्यातील नामांकित कंपनीतील प्रकार - Condoms in Samosa - CONDOMS IN SAMOSA

Condoms in Samosa : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. पिंपरी-चिंचवडमधील एका नामांकित ऑटोमोबाइल कंपनीच्या कँटीनच्या समोशामध्ये चक्क कंडोम, दगड आणि गुटखा आढळून आलाय. (Pimpri Chinchwad Police) 27 मार्च रोजी ही घटना घडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 5:36 PM IST

Updated : Apr 9, 2024, 6:56 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

पिंपरी चिंचवड Condoms in Samosa : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये कामगार खात असलेल्या समोशामध्ये कंडोम, गुटखा, आणि दगड अशा गोष्टी आढळून आल्या आहेत. या प्रकरणात चिखली पोलीस स्टेशनमध्ये (Condom found in Samosa) तक्रारदारानं पूर्वी समोसे पुरवणाऱ्या कंत्राटदार 'एसआरएस इंटरप्राईजेस'चे मालक रहीम शेख, अजहर शेख, मझर शेख, कामगार फिरोज शेख उर्फ मंटू आणि विकी शेख या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय.

काय आहे प्रकरण? : कंपनीमध्ये आपला समोसा पुरवठा करण्याचा करार रद्द झाल्यानं, संतापलेल्या कंत्राटदारानं नव्यानं समोसा पुरवठा करणाऱ्या कंपनीची प्रतिमा खराब करण्यासाठी आपल्या कामगारांच्या मदतीनं कट रचून समोशात कंडोम, गुटखा आणि दगड मिसळून कंपनीला समोसे पुरवले, अशी माहिती समोर आलीय. तशी अधिकृत माहिती देखील चिखली पोलिसांनी दिलीय. त्यामुळं बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलंय.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल : पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोबाईल फर्मच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात येतो. या फर्मनं दुसऱ्या एका कंत्राटदाराला कँटीनला समोसा पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांविषयी तक्रार केली. समोशामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

27 मार्च 2024 रोजी हा प्रकार घडला. समोशामध्ये कंडोम, पान, गुटखा, दगड अशा वस्तू आढळून आल्या आहेत. चिखली पोलीस ठाण्यात कलम 328, 120 ब नुसार गुन्हा दाखल केलाय. कंत्राट रद्द केल्यानं जुन्या कंपनीच्या सांगण्यावरुन आरोपीनं हे कृत्य केल्याचं समोर आलंय. पुढील तपास सुरू आहे - ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे

कंत्राट रद्द केल्याचा राग : चिखली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकरणात दोघांवर संशय व्यक्त केला. त्यांनीच समोशात कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचं समोर आलंय. 27 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. कँटीनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये कंडोम, गुटखा, पान मसाला, दगड आढळले होते. कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. समोशामध्ये काही तरी मिसळून ठेकेदाराला बदनाम करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. पोलिसांनी प्रकरणात पाच आरोपींना अटक केलीय. प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडल होतं : एका नामांकित कंपनीच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थ पुरवण्याचा करार कीर्तिकुमार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला होता. देसाई यांची कंपनी मोरवाडीच्या 'एसआरएस इंटरप्राइझेस' या कंपनीकडून खाद्यपदार्थ घेत होती. याबाबतचा त्यांच्यात करार झाला होता. मात्र, या खाद्यपदार्थामध्ये या पूर्वी देखील समोशात प्रथमोपचार पट्टी आढळली होती. यावरून देसाई कंपनीकडून करार रद्द करण्यात आला होता. नंतर मनोहर एन्टरप्राइझेसला हे कंत्राट देण्यात आलं होतं. त्यानंतर राग आल्यानं 'एसआरएस' या कंपनीनं देसाईंच्या कंपनीची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि कंपनीसह आपला करार संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदाराकडून केटरिंगचं कंत्राट मिळवण्यासाठी 'एसआरएस'चे मालक यांनी हे कृत्य केलं. त्यांनी आपल्याकडं काम करत असलेल्या फिरोज शेख आणि विकी यांना मनोहर एन्टरप्राइझेसमध्ये काम करायला पाठवलं. त्यांनी समोसे तयार करताना त्यात दगड, कंडोम गुटखा असे पदार्थ टाकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे आढळल्यावर कंपनीत खळबळ उडाली. पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेतला असता, पाच जणांना अटक केलीय.

हेही वाचा :

1 सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलाला मारहाण : चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Student Beaten In Pune University

2 एकनाथ शिंदे यांची शिवसेना न्यायालयानं प्रमाणित केलेली खरी शिवसेना; केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल - Keshav Upadhye On Uddhav Thackeray

3 "शिवसेना शिंदे गटाकडून तिकिट देण्याचं आश्वासन देऊनही मुलानं ऐकलं नाही, म्हणून..." गजानन कीर्तिकर यांचा गौप्यस्फोट - lok Sabha election 2024

Last Updated : Apr 9, 2024, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.