ETV Bharat / state

आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदार संघात उद्या सकाळी सात वाजतापासून मतदान होणार आहे. मतदानाची लगबग आतापासून सुरू झाली असून अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 1:36 PM IST

Updated : Apr 25, 2024, 2:24 PM IST

यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान

बुलढाणा Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगानं 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार शुक्रवार 26 एप्रिलला बुलढाणा लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. "लोकसभा मतदारसंघासाठी 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 हजार 104 ठिकाणी 1 हजार 962 मतदान मतदान केंद्र राहणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे," अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात शुक्रवारी होणार मतदान : बुलढाणा लोकसभा मतदार संघाकरता उद्या 26 एप्रिल रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 1962 मतदान केंद्र याकरता सज्ज करण्यात आले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघात शिवसेना, उबाठा, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदी पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. "गुरुवारी आणि शुक्रवारी निवडणुकीच्या काळात ताब्यात असलेल्या एकूण 40 एसटी बस 53 जीपवर जीपीएस यंत्रणा कार्यरत राहणार आहे. त्यामुळे कोणती बस आणि जीप कुठे याची माहिती निवडणूक मुख्य कार्यालयाच्या कंट्रोल रूमवर प्राप्त होईल. त्यामुळे कोणती टीम कुठं पोहोचल्या, तसेच कोणते झोनल ऑफिसर कुठे आहेत, याची माहिती कंट्रोल रूमला कळेल," अशी माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली.

इतके मतदार बजावणार पहिल्यांदा मतदानाचा हक्क : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यात 17 लाख 82 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यावेळी 18 ते 19 वर्षे वयोगटातील नव्यानं नोंदणी केलेले 26 हजार 500 मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. मतदार संघात 9 लाख 33 हजार 173 पुरूष, तर 8 लाख 49 हजार 503 महिला आणि 24 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. यात दिव्यांग 14 हजार 234, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 26 हजार 830, तर 4 हजार 395 सैन्यदलातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

1 हजार 962 केंद्रावर होणार मतदानाची प्रक्रिया : बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील 1 हजार 104 ठिकाणी स्थापित 1 हजार 962 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या सर्व मतदान केंद्रावर मतदारांना रांगेत उभं राहण्याची आवश्यकता राहणार नाही. याठिकाणी रांगविरहीत मतदानासाठी टोकन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना रांगेत उभं ठेवण्याऐवजी मतदान केंद्रालगत असलेल्या स्वतंत्र कक्षामध्ये बैठक, वीज, पंखे, पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन क्रमांकानुसार मतदानासाठी केवळ पाच मतदारांना रांगेत उभं ठेवण्यात येणार आहे. उष्ण वातावरणात मतदारांना मतदान करणं शक्य व्हावं, यासाठी सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली सुविधा देण्यात येणार आहे.

मतदान केंद्राचं वेबकास्टींगद्वारे ठेवणार लाईव्ह नियंत्रण : मतदानासाठी एकूण 1 हजार 962 मतदान केंद्र राहणार आहे. यापैकी 381 शहरी तर 1581 नागरी भागात मतदान केंद्र राहणार आहेत. यातील 987 मतदान केंद्राचं वेबकास्टींगद्वारे लाईव्ह स्वरूपात मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सक्षम अ‍ॅपद्वारे व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी अ‍ॅपवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानुसार या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाची सुविधा : मतदान प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी कर्तव्यावर नियुक्त असणाऱ्या मतदान केंद्रावर त्यांना मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 149 अधिकारी, कर्मचारी पोस्टाद्वारे मतदान करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी डाक मतदान प्रक्रियेची सुविधा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरून मतदानाला रविवारपासून सुरूवात झाली आहे. यात दिव्यांग 692 आणि 85 वर्षावरील 2 हजार 171 असे गृह मतदानासाठी नोंदणी केलेले एकूण 2 हजार 863 मतदारांचं मतदान करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच 5 हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.

मतदान केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागू : "लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 26 एप्रिल रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत जमावबंदी आदेश लागू राहतील. मतदान केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले असून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत­. लोकसभा निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना मतदानाला येण्यासाठी आणि मतदान केंद्रावर सर्व सोयी पुरविण्यात येणार आहेत. नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये निर्भयपणे सक्रीय सहभाग नोंदवून मतदान करावं," असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. चक्क शिवसैनिकांना दारूची झिंग! जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी; पोलिसांनी घेतलं ताब्यात - Shivsena drunk workers
  2. आपल्या देशात दररोज 'एप्रिल फुल डे' साजरा होत आहे - आदित्य ठाकरे - Aditya Thackeray criticizes BJP
  3. महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात; चार एप्रिलला भरणार अर्ज - lok Sabha Elections

Last Updated : Apr 25, 2024, 2:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.