नांदेड Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : काँग्रेसनं अनेकवेळा जुमालेबाजी केली, निवडणुकीआधी अनेक राज्यांमध्ये आश्वासन दिलं आणि नंतर योजनेसाठी केंद्राकडं पैसे मागितले. मात्र आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पैश्यांची पूर्ण तरतूद केली असून लाडक्या बहिणींना दोन वेळचा हप्ता मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये दिलं. या योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे हे दिल्लीत एका गुन्हेगाराला भेटल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगाराला भेटणं गुन्हा असल्याचं स्पष्ट केलं.
दिल्ली दौऱ्यात गुन्हेगाराला भेटणं गुन्हा : उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीत भेट दिली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगाराची भेट घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता, दिल्लीत जाऊन गुन्हेगाराला भेटणं हा गुन्हा आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी ठेवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्वांनी येण्याचं मान्य केलं. मात्र ऐनवेळी नेते आले नाहीत, आता यावेळी तरी बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमध्ये दिली. शरद पवार यांनी माझी भेट घेतली. राज्यातील वातावरण चांगलं राहावं, यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली, त्यामध्ये त्यांनी यावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
नेत्यांच्या गाड्यांसमोर आंदोलन करणं चुकीचं : उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी बीड इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीपुढं आंदोलन केलं. यावेळी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकण्यात आली. त्याचे पडसाद ठाण्यात उमटले. ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, नारळ आणि टमाटे फेकून आंदोलन करण्यात आलं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं आसता, त्यांनी "नेत्यांच्या गाड्यांसमोर आंदोलन करणं याचं समर्थन मी करत नाही. उद्या कोणी कोणासमोर आंदोलन करेल, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतीला शोभणारं नाही. मी कधीही खालच्या पातळीवर कोणावर बोललो नाही," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- दिल्लीत लोटांगण घालण्याची टीका करणारे ताल कटोरा मैदानात कशाला गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल - Eknath Shinde On Uddhav Thackeray
- "फक्त परमवीर सिंगच नव्हे तर मविआ सरकारकडून मलाही...", मुख्यमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा - CM Eknath Shinde
- शिवसेना शिंदे पक्षात नेमकं चाललंय काय? अनेक नेते नाराज, 'हे' नेते ठरतायत एकनाथ शिंदेंसाठी डोकेदुखी - Eknath shinde Shivsena