ETV Bharat / state

“आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटात जोर असावा लागतो”, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेला मुख्यमंत्र्यांचा पलटवार - CM Shinde On Uddhav Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 8:11 PM IST

CM Shinde On Uddhav Thackeray: मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी "यापुढे राजकारणात एक तर तुम्ही राहशील, नाहीतर मी राहील," असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (File Photo)

मुंबई CM Shinde On Uddhav Thackeray : बुधवारी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना "राजकारणात एक तर मी राहीन किंवा देवेंद्र फडणवीस राहतील" असं आव्हान दिलं होतं. यावरून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आज अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षक संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, " राजकारणात कोणी कोणाला संपवण्याची भाषा करू नये. महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये कामाची तुलना होऊ शकत नाही. मागील अडीच वर्षात अनेक विकासकामे झालेली आहेत. हे जनता सांगेल. ही विकासकामं महाविकास आघाडी सरकारमध्ये झाली नव्हती. घरात बसणाऱ्यांनी आधी मैदानात उतरावे. आम्ही फेसबुक लाईव्ह करणारे नाही. तर फिल्डवर उतरून 'फेस टू फेस' लोकांच्या समस्या जाणून घेतो. आव्हानाची भाषा करणाऱ्यांच्या मनगटात जोर असावा लागतो. लढण्यासाठी आधी मैदानात उतरा," असा जोरदार पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.

म्हणून यांचे धाबे दणाणले : पुढे मुख्यमंत्री म्हणाले, "मागील अडीच वर्षात या सरकारनं अनेक समाजपयोगी आणि लोकोपयोगी प्रकल्प राबवले आहेत. अनेक विकासकामे आणि विविध प्रकल्पांची कामे केली आहेत. आता लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लाडक्या भावाचे काय? असं त्यांनी विचारलं. आम्ही लगेच लाडका भाऊदेखील आणला. म्हणून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचे, महिलांचे, दीनदुबळ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत."

एक-एक पैसा देणार : "विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खोटा नॅरेटिव्ह सेट केला होता. परंतु आता हे चालणार नाही. आम्ही 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' योजना आणल्यानंतर सरकारकडे पैसा नाही. असा प्रचार विरोधक करत आहेत. परंतु रक्षाबंधनच्या आधी लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जातील. एक-एक पैसा आम्ही सामान्य जनतेला देण्यासाठी कटिबद्ध आहोत," अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली.

हेही वाचा -

  1. रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये, तुमची उठ-बस सेना का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Eknath Shinde news
  2. Eknath Shinde on Uddhav Thackeray : बाळासाहेबांनी अपमान सहन करणाऱ्याला जोड्याने हाणला असता; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
  3. Eknath Shinde Uddhav Thackeray Dispute : एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शिवसेनेने साधली चुप्पी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.