ठाणे Lok Sabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांची आज प्रचार रॅली ठाण्यातली किसन नगर येथून निघाली असता, मुख्यमंत्री शिंदेंनी या रॅलीमध्ये स्वतः उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर एक लहान मुलगा त्यांना जखमी झाल्याचं दिसून आला. या मुलाचा हात भाजला होता. तर मुलगा आणि त्याची आई मुख्यमंत्र्यांसमोरून टाहू फोडत पुढे निघाले होते.
मुख्यमंत्री शिंदे झाले भावनिक : मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार रथ थांबून क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडं धाव घेतली. त्या मुलाला मुख्यमंत्री शिंदे स्वतः हाताला धरून एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले. या जखमी झालेल्या लहान मुलाचं नाव देखील 'रुद्रांश' असल्यानं मुख्यमंत्री शिंदे थोड्या प्रमाणात भावूक झाल्याचं देखील दिसून आले. आमच्या घरी देखील एक 'रुद्रांश' आहे असं भावनिक आवाजात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
व्यस्त असताना देखील प्रचार : कोल्हापूरचा प्रचार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात हजेरी लावली आणि आपल्या बालेकिल्ल्यात किसन नगर श्रीनगर भागात ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी प्रचार केला. प्रचाराची रॅली सुरू असताना हा प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांमधला कार्यकर्ता जागा झाला. यावेळी शिंदे यांनी तत्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतलं आणि त्याला जवळील एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तिथे जाऊन त्यांनी डॉक्टराना त्याच्या भाजलेल्या हातावर तत्काळ उपचार करायला सांगितले. तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच शिंदे हे पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'साताऱ्याची निवडणूक...' - Lok Sabha Election 2024
- हेमंत करकरेंना 'आरएसएस' समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातल्या गोळ्या, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ - Vijay Wadettiwar
- शिव महापुराण निमित्त निघालेल्या कलश यात्रेत महिलेचा मृत्यू; परतवाडा येथील घटना - Woman Dies Due To Sunstroke