ETV Bharat / state

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटांत, 'कोस्टल रोड' आजपासून प्रवासासाठी खुला - Mumbai Coastal Road

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 8:13 AM IST

CM Shinde Inaugurate Coastal Road : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (12 सप्टेंबर) लोकार्पण झालं.

CM Eknath Shinde inaugurate arch bridge connecting coastal road with sea link
कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन (CM Eknath Shinde X account)

मुंबई CM Shinde Inaugurate Coastal Road : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (12 सप्टेंबर) लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. महायुतीचे सरकार शब्द देणारे आणि दिलेला शब्द पाळणारे असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

गेम चेंजर प्रकल्प : कोस्टल रोड हा गेम चेंजर प्रकल्प आहे. या प्रकल्पातील मरीन लाईन्स ते वांद्रे सी लिंक हा टप्पा पूर्ण होणे नागरिकांसाठी दिलासादायक आहे. कोस्टल रोड वांद्रे सी लिंकला जोडण्यात आल्याने नरीमन पॉईंट ते वांद्रे जाण्यासाठी आता अवघी दहा मिनिटे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मार्गामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल व इंधनात देखील मोठी बचत होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे केवळ 10 मिनिटांत : पुढं ते म्हणाले की, "13 सप्टेंबरपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. मार्च महिन्यात कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. आता दक्षिण मुंबईतील वाहन चालकांना थेट सी लिंकपर्यंत विना सिग्नल प्रवास करता येईल. मरीन लाईन्सपासून वांद्रे जाण्यासाठी अवघा दहा ते बारा मिनिटांचा प्रवास करावा लागेल. त्यामुळं मुंबईकर, वाहनचालक, प्रवाशांचा वेळ आणि इंधन बचत होईल. वर्सोवा भाईंदर ते विरार या प्रकल्पाचं देखील काम पुढं नेत आहोत. त्यामुळं मुंबई ते विरार हा दोन तीन तासांचा प्रवास 40 ते 50 मिनिटांत पार करता येईल. वाढवण इथं तयार होत असलेल्या बंदराला देखील या प्रकल्पाचा लाभ होईल.

भूमीपूजनाला फडणवीसांना डावललं : "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडून त्यांनी या प्रकल्पाला आवश्यक सर्व परवानग्या मिळवल्या. मात्र, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला त्यांना बोलावण्याचं औदार्य दाखवण्यात आलं नाही, असा टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. मात्र, आपण भूतकाळात जाण्यापेक्षा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करणारे असल्यानं त्याबद्दल जास्त बोलणार नाही," असही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर परवानगी आणि कामाला वेग : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "25 वर्षांपासून हा प्रकल्प पडलेला होता. यापूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री दिल्लीत जात होते. मात्र, परवानगी मिळत नव्हती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या प्रकल्पाला परवानगी मिळाली आणि कामाला वेग आल्याचा दावा फडणवीसांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे काम ठप्प होतं. मोदी सरकार आणि महायुती सरकारमुळंच हा कोस्टल रोड तयार झाला." तसंच शिंदे सरकार आल्यानंतर या कामाला वेग आल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. सुसाट मुंबई...! कोस्टल रोडचा 'हा' मार्ग उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत - Coastal Road
  2. आदित्य ठाकरे यांची कोस्टल रोड प्रकरणात चौकशी करा - आशिष शेलार यांची मागणी - Coastal Road case
  3. मरीन ड्राइव्ह ते हाजी अली फक्त 9 मिनिटांत! कोस्टल रोडचा दुसरा बोगदा प्रवाशांसाठी खुला, 'या' दोन दिवशी राहणार बंद - Mumbai Coastal Road
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.