मुंबई CM Eknath Shinde Flag Hoisting : आज देशभर ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' (Varsha) या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण सोहळा पार पडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दोरी गठ्ठ बांधल्यानं ध्वज उघडलाच नाही : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणवेळी काही क्षण लोक गोंधळात पडले होते. ध्वज बांधताना त्या दोरीची गाठ गठ्ठ बांधण्यात आली होती. त्यामुळं ध्वजारोहण करताना ध्वज उघडलाच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० सेकंद दोरी ओढत ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही ध्वज उघडलाच नाही. त्यानंतर तेथील सुरक्षा दलाच्या कर्मचाऱयाने धाव घेत दोरी ओढत ध्वज फडकवला. त्यानंतर राष्ट्रगीत झालं.
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde hoists the national flag on the occassion of #IndependenceDay2024 pic.twitter.com/Yr94GlaiCw
— ANI (@ANI) August 15, 2024
बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १७ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमाद्वारे करोडो बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचेही पैसे युवकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
विजयाचा आणि आनंदाचा दिवस : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ज्या स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं त्या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो, आजचा हा दिवस संपूर्ण देशासाठी, महाराष्ट्रासाठी विजयाचा आणि आनंदाचा दिवस आहे. ज्यांच्यामुळं आपणाला हे स्वतंत्र भेटलं, त्यांचं आपण ऋण कधीच फेडू शकत नाहीत. म्हणून मी फक्त देशभरातील नाही तर जगभरातील सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो". हा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात आपण उल्हासात जल्लोषात साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान आपण 'हर घर तिरंगा' हे अभियान राबवलं आहे. या मोहिमेमुळं प्रत्येक गावागावात, घराघरांमध्ये हा तिरंगा पोहोचला आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली आहे.
हर घर तिरंगा एक चळवळ : ३ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची संकल्पना राबवली. बघता बघता त्यातून एक चळवळ निर्माण झाली. देशभक्तांमध्ये एक चैतन्य निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनात देशाप्रती एक आदराची भावना या कार्यक्रमातून दिसून आली. ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं 'हर घर तिरंगा' या अभियानाची सुरुवात झाली.
बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात : गुरूवारपासून (14 ऑगस्ट) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत. आम्ही जेव्हा ही योजना घोषित केली तेव्हा सांगितलं होतं की, रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्याप्रमाणं सुरुवात झाली असून १७ ऑगस्टला मोठा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचेही आम्ही हजारो युवकांना नियुक्तीपत्र दिलं आहे. या अनुषंगाने जो काही प्रशिक्षण भत्ता त्यांना भेटणार आहे त्याचीही सुरुवात झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- गणवेशाविना विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा; मंत्री म्हणतात, महिना अखेर गणवेश मिळणार - School Uniform
- भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यास सक्षम - पंतप्रधान नरेंद्र मोदी - Independence Day 2024
- देशभरात साजरा होतोय 78 वा स्वातंत्र्यदिन; 'प्रजासत्ताक दिनी' आणि 'स्वातंत्र्य दिनी' राष्ट्रध्वज फडकवण्यात 'हा' फरक - Independence Day 2024